
सौंदाळेच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू
टीपः swt२७१९.jpg मध्ये फोटो आहे.
5426 - वृषाल गुरव.
5427
पडेल ः येथे दुचाकी आणि मोटार यांच्यामध्ये शनिवारी अपघात झाला.
सौंदाळेच्या तरुणाचा
दुचाकी अपघातात मृत्यू
पडेल कॅन्टीनजवळ मोटारीशी धडक
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २७ ः दुचाकी आणि मोटार यांच्यामध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. वृषाल संतोष गुरव (वय २५, रा. सौंदाळे) असे त्याचे नाव आहे. विजयदुर्ग कासार्डे मार्गावर तालुक्यातील पडेल कॅन्टीनपासून काही अंतरावर आज दुपारी दीडच्या सुमारास अपघात झाला. विजयदुर्ग पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक भारतकुमार फार्णे यांनी सांगितले की, सौंदाळेचा वृषाल दुचाकीने घरी निघाला होता. सांगली येथील कुटुंबीय पर्यटनाच्या निमित्ताने मोटारीने विजयदुर्गच्या दिशेने निघाले होते. विजयदुर्ग कासार्डे मार्गावर पडेल कॅन्टीनपासून काही अंतरावर दोन्ही वाहनांमध्ये धडक झाली. अपघातात वृषाल रस्त्यावर फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची बातमी समजताच पडेल कॅन्टीन परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. याबाबत विजयदुर्ग पोलिस ठाण्याला कळविण्यात आले.
फार्णे यांच्यासह उपनिरीक्षक जी. पी. भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तेथे सौंदाळे ग्रामस्थांनी गर्दी केली. वृषालच्या मागे आई, वडील आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. त्याच्या बहिणीचे याच महिन्यात लग्न झाले होते.