सकाळ नाट्य-कराड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ नाट्य-कराड
सकाळ नाट्य-कराड

सकाळ नाट्य-कराड

sakal_logo
By

05387, 05391

सकाळ नाट्य महोत्सव रंगणार सहा जूनपासून
सवलतीच्या दरात तिकीटे; व्यावसायिक रंगभूमीवरील लोकप्रिय नाटकांचा आविष्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ : दर्जेदार नाटकांसाठी आसुसलेल्या कराडकरांसाठी सहा ते आठ जून दरम्यान सकाळ नाट्य महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात सादर होणाऱ्या नाटकांचा आस्वाद घेण्याची इच्छा असणाऱ्या रसिकांसाठी तिकिटांवर भरघोस सवलत दिली जाणार आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात रोज रात्री साडेनऊ वाजता महोत्सव होणार आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील तीन दर्जेदार नाटके या महोत्सवात रसिकांना पाहता येणार आहेत. महोत्सवाचे मुख्य प्रायोजक चितळे डेअरी आणि सहयोगी प्रायोजक तनिष्क ज्वेलर्स व यशवंत को-ऑपरेटीव्ह बॅंक लिमिटेड (फलटण) हे आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची दैनंदिन तिकिटे उपलब्ध आहेत. दैनंदिन तिकिटे ‘बुक माय शो’च्या संकेतस्थळासह फोन बुकींगवर उपलब्ध आहेत. ९४२२४०५००७ या क्रमांकावर संपर्क साधून सुध्दा तिकीटे आरक्षित करता येतील. त्याशिवाय यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, चितळे एक्स्पेस (राजारामपुरी) येथे लवकरच तिकीटे उपलब्ध होणार आहेत.
------------
महोत्सवाचे तपशील असे
कधी : ६ ते ८ जून
केव्हा : दररोज रात्री ९.३० वाजता
कुठे : यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, कराड
----
महोत्सवाचे वेळापत्रक
मंगळवार (ता. ६) : ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’
बुधवार (ता. ७) : ‘नियम व अटी लागू’
गुरूवार (ता. ८ ) : ‘तू तू मी मी‘
..........
तिकिटांचे दर (प्रति व्यक्ती, रुपये)
संपूर्ण महोत्सवाचे तिकिट (तळमजला) : १२००
प्रतिनाटक तिकिट (तळमजला) : ५००
प्रतिनाटक तिकिट (बाल्कनी) : ४००

चौकट
सेलीब्रिटींशी संवाद
प्रशांत दामले, भरत जाधव, संकर्षण कऱ्हाडे यांच्यासह मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील सेलीब्रिटींचा नाट्याविष्कार यानिमित्ताने सजणार आहे. त्याशिवाय त्यांच्याशी संवादही साधता येणार आहे. सध्याच्या व्यावसायिक रंगभूमीवर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या नाटकांचा महोत्सवात समावेश आहे. साहजिकच ही एक वेगळी पर्वणी कोल्हापूरकरांना अनुभवता येणार आहे.