मुश्रीफ कार्यक्रम

मुश्रीफ कार्यक्रम

05450
गडहिंग्लज : हट्टीबसवण्णा परिसरात मुश्रीफ फौंडेशनतर्फे मारण्यात आलेल्या विंधन विहिरीचे लोकार्पण करताना हसन मुश्रीफ.
------------

श्रेयापेक्षा दुर्बलांना मदतीचे समाधान

हसन मुश्रीफ : विंधन विहिर लोकार्पण समारंभ

गडहिंग्लज ता. २७ : ‘निवडणुका नजेरसमोर ठेवून विरोधक श्रेयवादाचे राजकारण करत आहेत. गेल्या पंधरा वर्षात माझ्या विधानसभा कार्यक्षेत्रात येणाऱ्या गडहिंग्लज परिसराचा विविध योजनांच्या माध्यमातून कायापालट केला. सर्वसामान्य हे सर्व जाणतात. त्यामुळे मला श्रेयवादापेक्षा दुर्बलांना मदतीचे अधिक समाधान असल्याचे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
विविध ८१ लाख रुपयांची विकासकामे आणि मुश्रीफ फौंडेशनमार्फत हट्टीबसवणा परिसरात मारण्यात आलेल्या विंधन विहिरीच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामाप्पा करिगार, सुरेश कोळकी, अशोक मेंडूले, शिवराज पाटील, सुभाष देवगौंडा, विजय बणगे, विनायक नाईंक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. गुंडू पाटील यांनी स्वागत केले.
श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘सतरा वर्षांहून अधिक काळ राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. प्रत्येक खात्याचा सामान्यांसाठी वापर केला. गडहिंग्लज शहरालगतच्या वसाहती मुलभूत सविधांपासून वंचित होत्या. गेल्या अडीच वर्षात हे चित्र पालटले आहे. रोज पहाटे साडेपाच वाजल्यापासून झोपेपर्यंत मी गरजूंना उपलब्ध असतो. मी पाठपुरावा करुन मंजुरी आणि पूर्ण केलेल्या कामांचे विरोधक उदघाटन करून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. पण, त्यांना विकासकामांशी काहीही देणेघेणे नाही.’
यावेळी सतीश पाटील, उदय जोशी, किरण कदम यांची भाषणे झाली. आभार डॉ किरण खोराटे यांनी आभार मानले. रफिक पटेल यांनी सूत्रसंचलन केले.
...

गडहिंग्लज पालिका अव्वल बनवू

‘विकासकामांच्या जोरावर स्थानिक कार्यकर्त्यांचीं पालिकेवर सत्ता आणायचा निर्धार आहे. गडहिंग्लजच्या मतदारांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात पालिका द्यावी. कागलच्या धर्तीवर ही पालिका देशात अव्वल बनवून दाखवू,’ असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com