
स्त्री शक्ती समाधान शिबीर भडगाव येथे उत्साहात
05478
भडगाव : स्त्री शक्ती समाधान शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी वंदना शेंडुरे, रवीशंकर बंदी, सागर दांगट, दत्तात्रय गुरव, अजित पोवार व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
स्त्री शक्ती समाधान शिबीर
भडगाव येथे उत्साहात
गडहिंग्लज, ता. २८ : महावितरणच्या गडहिंग्लज उपविभागीय कार्यालयातर्फे भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिर उत्साहात झाले.
उपकार्यकारी अभियंता सागर दांगट यांनी महावितरण देत आलेल्या सुविधा व शासनाने जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सहायक लेखापाल प्राजक्ता कुरणे, लिपीक दीपिका घबाडे यांनी महिलांसोबत संवाद साधला. बिलिंग तक्रार, नावात बदल, वीज बिलाची माहिती, मोबाईल अॅपचे फायदे व महावितरण वॉलेटची माहीती दिली. महावितरणच्या गुण नियंत्रण विभागाचे सहाय्यक अभियंता दत्तात्रय गुरव, अजित पोवार यांनी नवीन वीज जोडणी, सुरक्षा, घरघुती विद्युत उपकरणे सुरक्षित रित्या कशी हाताळावीत, ई. एल. सी. बी. आणि अर्थिंगचे महत्व, विजेची बचत, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी, छतावरील सौर, कपँसिटर महत्वाविषयी मार्गदर्शन केले.
भडगावच्या सरपंच वंदना शेंडूरे, उपसरपंच रविशंकर बंदी, ग्रामविकास अधिकारी राजाराम घेवडे यांच्यासह सदस्यांचे सहकार्य मिळाले. बसवराज बंदी, श्रद्धा शिंत्रे, योगेश तराळे, अर्चना पट्टणकुडी आदी उपस्थित होते. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गट महिलांच्या कामाचा गौरव व सत्कार झाला. अल्पोपहारची सोय केल्याबद्दल त्रिपुरा फाउंडेशनच्या कांचन वाघराळकर यांचा सत्कार झाला.