
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त
आयएमएतर्फे परिचारिकांचा सत्कार
गडहिंग्लज : येथील इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. गडहिंग्लज परिसरातील हॉस्पीटलमध्ये कार्यरत परिचारीकांनी बजावत असलेल्या सेवेबद्दल, विशेष करुन कोविड काळात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. स्त्री रोग तज्ञ डॉ. सीमा पाटणे, बालरोगतज्ञ डॉ. राजश्री पट्टणशेट्टी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. हॉस्पीटलमध्ये दैनंदिन कामकाजात परिचारीकांनी जंतूसंसर्ग रोखण्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजना यावर डॉ. राकेश बेळगुद्री यांनी मार्गदर्शन केले. आयएमएचे अध्यक्ष डॉ. बी. आर. पाटील व सचिव डॉ. विनय माने, खजिनदार डॉ. राकेश बेळगुद्री यांच्यासह आयएमएचे सर्व सदस्य डॉक्टर्स व परिचारिका उपस्थित होते.
-------------------
05481
सुभाष पाटील, शशिकांत कांबळे
पालक संघ अध्यक्षपदी सुभाष पाटील
गडहिंग्लज : ओंकार महाविद्यालयातील पालक संघाच्या अध्यक्षपदी सुभाष पाटील (उत्तूर) यांची निवड झाली. उपाध्यक्ष म्हणून पूजा दुंडगे (जरळी) तर सचिवपदी होन्याळीचे शशिकांत कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली. शिक्षक-पालक संघाच्या बैठकीत ही निवड प्रक्रिया झाली. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. या वेळी चव्हाण यांनी पालकांच्या विश्वासावर महाविद्यालयाची वाटचाल सुरु असल्याचे सांगितले. पालक संघात सर्जेराव गुरव, गजानन कुंभार, बाळासाहेब गुरव, कृष्णा हुंदळेकर, मनिषा तिप्पे, जितेंद्र देसाई, मंजूनाथ घस्ती, स्वागत पाटील (सर्व सदस्य) यांचा समावेश आहे. कविता पोळ, प्रज्ञ. सचिन पाटील, प्रकाश कांबळे उपस्थित होते. समन्वयक डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांनी स्वागत केले. क्रांती शिवणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनिल पाटील यांनी आभार मानले.
-------------------
शाहू कॉलेजचा निकाल ६७.८५ टक्के
गडहिंग्लज : येथील राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ६७.८५ टक्के लागला. महाविद्यालयात अनुक्रमे विद्या चौगुले ७९.३३, सुनिल गिजवणे ६१.३३, समीक्षा किल्लेदार ६१.३३, काशिनाथ लोखंडे ५६.३३ या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर, प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण, प्रा. कविता पोळ, प्रा. क्रांती शिवणे, प्रा. स्नेहल ताडे, प्रा. शितल डवरी, प्रा. प्रशांत कांबळे, अनिल सावरे यांचे मार्गदर्शन मिळाले.