विकासकामे प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासकामे प्रारंभ
विकासकामे प्रारंभ

विकासकामे प्रारंभ

sakal_logo
By

M05558
...
चाळीस टक्केचा कर्नाटकी पॅटर्न
कोल्हापुरात येतोयः सतेज पाटील

महापालिकेच्या निवडणुका घेण्यास सरकार घाबरत असल्याची टीका

कोल्हापूर, ता. २८ ः ‘ मंजूर केलेली विकासकामे करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जुना मंजूर निधी दुसरीकडे वळवला जात आहे. यातून ४० टक्केचा कर्नाटकी पॅटर्न कोल्हापुरात येऊ पाहत आहे,’ अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली.
न्यू शाहूपुरी व नागाळा पार्क प्रभागातील रस्ते कामाचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘आम्ही आणलेल्या निधीतही सत्ताधारी आडकाठी घालत आहेत. रस्त्यांसाठी आणलेला निधी बाकडी आणि ओपन जीमसाठी वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही कोल्हापूर शहराच्या विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहे. इतरत्र निवडणुका होत आहेत. मात्र महापालिकेच्या निवडणुका घेण्यास सरकार घाबरत आहे.’
याप्रसंगी आमदार जयश्री जाधव, राजेश लाटकर यांची भाषणे झाली. यावेळी शारंगधर देशमुख, संजय मोहिते, अर्जुन माने, प्रसाद कामत, दिलीप शिर्के, संजय घाटगे, राजेश घाटगे, दिपाली घाटगे, तनुजा घाटगे, तनुजा कामत, दिलीप बनसोडे, सुनील भांडवले आदी उपस्थित होते.