
यजमान इचलकरंजी संघ विजेता
ich285.jpg
05571
इचलकरंजी ः बास्केटबॉल स्पर्धेतील विजेत्या इचलकरंजी संघाला मदन कारंडे यांच्याहस्ते बक्षिस देण्यात आले. यावेळी प्रकाश मोरबाळे, राहूल खंजीरे उपस्थीत होते.
यजमान इचलकरंजी संघ विजेता
बास्केटबॉल स्पर्धा; घुणकीचा चॅलेंजर्स उपविजेता
इचलकरंजी, ता. २८ ः येथे झालेल्या बास्केटबॉल स्पर्धेत यजमान न्यू बास्केटबॉल असोसिएशनच्या संघाने विजेतेपद पटकावले. घुणकीचा चॅलेंजर्स संघ उपविजेता ठरला. बास्केटबॉल असोसिएशन, कोल्हापूरच्या मान्यतेने व न्यू बास्केटबॉल असोसिएशन, इचलकरंजी यांच्यावतीने निमंत्रित संघांसाठी ही स्पर्धा आयोजीत केली होती. देशभक्त बाबासाहेब खंजीरे जन्म शताब्दी महोत्सवानिमित ही स्पर्धा झाली.
अंतिम सामना चॅलेंजर्स व न्यू बास्केटबॉल असोसिएशन यांच्यात रंगला. अतिशय उत्कंठावर्धक झालेल्या या सामन्यात न्यू बास्केटबॉल संघाने चॅलेंजर्स संघाचा ५२-४६ अशा फरकाने पराभव केला. बेस्ट शूटर अभिषेक कुंभार (चॅलेंजर्स), बेस्ट डिफेंडर अभिषेक शिंदे (न्यू बास्केटबॉल), सर्वोत्कृष्ट खेळाडू रोहित शेलार (न्यू बास्केटबॉल) यांना वैयक्तीक बक्षिसे दिली.
स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांच्या हस्ते केला. स्पर्धांमुळे नवीन खेळाडू तयार होणार असून त्यांनी देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर शहराचे नाव करावे, असे मत कारंडे यांनी व्यक्त केले. जन्म शताब्दी महोत्सवाचे कार्याध्यक्ष राहुल खंजीरे यांनी युवकांच्यात खेळाविषयी आवड निर्माण करून देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांना जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करण्याचा प्रयत्न असल्याचे नमूद केले. स्पर्धा पार पाडण्यासाठी संतोष पाटील, धीरज होगाडे, आकाश चव्हाण, किरण कोष्टी, संदीप जासूद, अमित यादव, सागर चौगुले, निलेश रावळ, ऋषिकेश कुडाळकर, अरविंद हणबर, चेतन खंडेलवाल यांनी परिश्रम घेतले. आभार आप्पा कुचेकर यांनी मानले.