
मोरे, पाटील प्रथम
05585
गडहिंग्लज : आधार फाउंडेशनतर्फे आयोजित मॅरेथॉनमधील विजेत्यांना बक्षीस वितरण प्रसंगी सतीश हळदकर, धनंजय कळेकर, संदीप कुराडे आदी उपस्थित होते.
मोरे, पाटील प्रथम
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त येथील आधार फाउंडेशनतर्फे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र मॅरेथॉनमध्ये पुरुष गटातून विवेक मोरे तर महिला गटात ऋतुजा पाटील हिने प्रथम क्रमाक पटकावला.
मॅरेथॉनसाठी अकरा किलोमीटरचे अंतर निश्चित केले होते. स्पर्धेचा निकाल असा : पुरुष गट - शिवराज घोलराखे, रोहन चौगुले, पुष्पक खैरे. महिला - सृष्टी रेडेकर, गायत्री पाटील, रोहिणी पाटील. विजेत्यांना सायकल, जिमचे साहित्य बक्षीस देण्यात आले. डॉ. रवींद्र हत्तरकी, डॉ. युवराज घेवडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश हळदकर यांनी आधार फाऊंडेशनतर्फे राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. धनंजय कळेकर, लता पालकर, संदीप नाथबुवा, श्रीकांत मोहिते, सागर तोंदले, सुरज शिंदे, हेमंत काटवळ, संदीप पाटील, बाबू माने, संदीप कुराडे, विनायक शिंदे, गुलाब पुरोहित, संजय बंदी आदींचे सहकार्य मिळाले.