
रस्ते कामांसाठी एक कोटी
05639
विकासकामांत आड येणाऱ्यांना
जशास तसे उत्तर; कॉंग्रेसकडून इशारा
रस्ते कामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर
कोल्हापूर, ता. २८ ः महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेला व नंतर शिंदे-फडणवीस सरकारने त्यातील थांबवलेल्या कामांसाठी आता पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील रस्ते कामांचे उद्घाटन आज आमदार सतेज पाटील व आमदार जयश्री जाधव यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी विकासकामांआड कुणी येत असेल तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकांनी दिला.
पाच कोटींच्या निधीतून अंबाबाई मंदिर परिसरातील तीन रस्त्यांची एक कोटीची कामे केली जाणार आहेत. मूलभूत सुविधांतर्गत महाविकास आघाडी काळात दहा कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यानंतर सरकार बदलले व शिंदे-फडणवीस सरकारने तो निधी थांबवला. त्यानंतर आमदार सतेज पाटील व माजी नगरसेवकांनी पाठपुरावा केला. शहराच्या विकासासाठी आणि शहरवासीयांचे नुकसान टाळण्यासाठी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला. त्यातून शहरातील काही प्रभागांतील रस्त्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर केला. अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांसाठी एक कोटीचा निधी दिला आहे. त्यासाठी शारंगधर देशमुख, ईश्वर परमार, करण शिंदे यांनी पाठपुरावा केला.
उद्घाटनावेळी आमदार जयश्री जाधव यांनी राजकारणापेक्षा समाजकारण करून शहराचा विकास करूया असे आवाहन केले. तर गटनेते शारंगधर देशमुख, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी रस्त्यांसाठीचा निधी बाकडी, ओपन जिमकडे वळवणाऱ्या तसेच विकासकामात आड येणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिला. या वेळी प्रतापसिंह जाधव, गणी आजरेकर, इंद्रजित बोंद्रे, नरेंद्र ओसवाल आदी उपस्थित होते.