
कोल्हापूर पोलिस संघ विजेता
ich2811.jpg
05633
इचलकरंजी ः राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेतील विजेत्या कोल्हापूर पोलिस संघाला आमदार राजू आवळे यांच्याहस्ते बक्षिस देण्यात आले.
कोल्हापूर पोलिस संघ विजेता
राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा; एसडी पाटील ट्रस्ट, इस्लामपूर उपविजेता
इचलकरंजी, ता. २८ ः देशभक्त बाबासाहेब खंजीरे क्रिडांगणावर झालेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत कोल्हापूर पोलिस संघाने विजेतेपद मिळवले. एसडी पाटील ट्रस्ट (इस्लामपूर) या संघाचा अंतिम सामन्यात पराभव झाला. त्यामुळे या संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
रोमहर्षक अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी १ - १ असे समान गोल केले होते. त्यामुळे सामना बरोबरीत झाला. त्यामुळे पेनल्टी स्ट्रोकवर सामन्याचा निकाल लागला. कोल्हापूर पोलिस संघाने एसडी पाटील ट्रस्ट, इस्लामपूर या संघावर ३ - १ अशा गोल फरकाने मात केली. वैयक्तिक बक्षिसांमध्ये बेस्ट गोल कीपर किरण मोहिते (कोल्हापूर पोलिस), मॅन ऑफ दि मॅच ओंकार कावरे (कोल्हापूर पोलिस) तर मॅन ऑफ दि सिरीजचा पुरस्कार सचिन भोसले एसडी पाटील ट्रस्ट (इस्लामपूर) यांना मिळाला. तत्पूर्वी झालेल्या महिलांच्या प्रदर्शनीय सामन्यात कोल्हापूर सिनिअर संघाने कोल्हापूर जुनिअर संघावर २-० असा विजय मिळवला.
स्पर्धेचा बक्षिस समारंभ आमदार राजू आवळे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटचे अध्यक्ष राहूल खंजीरे होते. माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, उदय बुगड, दिलीप मुथा, धनराज खंडेलवाल, धोंडीराम कस्तुरे, प्रेमसिंग चौहान, सुरेखा पाटील आदी उपस्थीत होते. देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत नामांकीत बारा संघ सहभागी झाले होते.