करवीर कामगार संघातर्फे ठिय्या आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करवीर कामगार संघातर्फे ठिय्या आंदोलन
करवीर कामगार संघातर्फे ठिय्या आंदोलन

करवीर कामगार संघातर्फे ठिय्या आंदोलन

sakal_logo
By

ich291.jpg
05724
इचलकरंजी ः आवास योजनेप्रश्नी महापालिकेसमोर करवीर कामगार संघातर्फे आंदोलन केले.

करवीर कामगार संघातर्फे ठिय्या आंदोलन
इचलकरंजी, ता. २९ ः प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारात करवीर कामगार संघाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलनास आजपासून सुरुवात केली.
योजनेच्या अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सहा वर्षे पाठपुरावा सुरू आहे, पण योजनेसाठी जागेचा वाद सुरू आहे. महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एकमेकांकडे बोट दाखवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ही योजना रखडली आहे. त्यामुळे कामगार हक्काच्या घरकुलापासून वंचित राहत आहे. त्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आजपासून आंदोलन सुरू केल्याचे सांगण्यात आले. याप्रश्नी तातडीने मार्ग न काढल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनात दादासाहेब जगदाळे, दादू मगदूम, वर्षा जाधव, मीना भोरे, समीर दानवाडे आदी सहभागी झाले आहेत.