
आजरा तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेला ३७ लाखांवर नफा
आजरा तालुका माध्यमिक शिक्षक
पतसंस्थेला ३७ लाखांवर नफा
आजरा, ता. २९ ः आजरा तालुका माध्यमिक शाळा सेवक पतसंस्थेला ८८ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. सर्व तरतुदी करुन ३७ लाख ५९ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून संस्था प्रगतीचे टप्पे पार करीत आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजीव देसाई यांनी दिली.
संस्थेने यंदाच्या आर्थिक वर्षात ५४ कोटी ७४ लाखांची उलाढाल केली आहे. संस्थेचे भाग भांडवल १ कोटी ८३ लाख आहे. ८१ लाख ३९ हजार रुपयांचा निधी आहे. संस्थेकडे १९ कोटी २३ लाखांच्या ठेवी असून १५ कोटी ७७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. ७ कोटी १३ लाखांची गुंतवणूक आहे. पाच वर्षे एनपीए तरतूद केलेली नाही.
२३ कोटी ८३ लाखांचा संस्थेचा ताळेबंद आहे. गतवर्षी १४ टक्के लाभांश देत २ टक्के दिवाळी बोनस दिला होता. कर्जावरील व्याजदर १० टक्के आहे. सुरक्षा ठेव व्याजातून १० लाखांची कर्जमाफी दिली जाते. कर्ज मर्यादा ५० लाख असून आकस्मिक ८० हजार व विशेष कर्ज ५० हजार दिले जाते. सभासदांचा अपघाती विमा उतरवला जातो. समाजोपयोगी विविध उपक्रमे संस्थेतर्फे राबवले जातात. यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संचालक गजानन चिगरे, अभिजित देसाई, शरद पाटील, शिवाजी तांबेकर, रविंद्र पाटील, ईश्वर शिवणे, अशोक कांबळे, सौ.उमाराणी जाधव, अस्मिता पुंडपळ उपस्थित होते.