जिल्हा बँक बढती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बँक बढती
जिल्हा बँक बढती

जिल्हा बँक बढती

sakal_logo
By

जिल्हा बँकेच्या नऊ उपव्यवस्थापकांना बढती

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेच्या नऊ उपव्यवस्थापकांना व्यवस्थापकपदी बढती मिळाली. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ होते. यावेळी आमदार पी.एन. पाटील, माजी खासदार निवेदिता माने व संचालक उपस्थित होते. जिल्हा बँकेतील उपव्यवस्थापकांना बढती मिळाल्यानंतर त्यांच्या पगाराबाबत कर्मचारी युनियनशी चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, शिवाजी आडनाईक, शरद बावधनकर, रविंद्र शिंगे, अण्णासाहेब वाळके, अल्ताफ मुजावर, चंद्रकांत रावण, सुनील लाड, सुनील वरुटे या अधिकाऱ्यांना बढती मिळाली आहे.