
पीएम निधी
दोन कोटींवर
कर्जाचे वितरण
कोल्हापूर : पीएम स्वनिधी योजना व दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरातील ३७१ फेरीवाले, ३० बचत गटांना व ९ बचत गटांना फिरता निधी वितरित करण्यात आला. सव्वा दोन कोटींवर कर्ज वितरण करेले. शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविला जात आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू असून, पीएम स्वनिधी योजनेंतर्गत प्रथम कर्ज १४० फेरीवाल्यांना दहा हजारप्रमाणे चौदा लाख, द्वितीय कर्ज १०३ फेरीवाल्यांना २० हजारांप्रमाणे वीस लाख साठ हजार रुपये, तृतीय कर्ज १२८ फेरीवाल्यांना ५० हजारांप्रमाणे चौसष्ट लाख रुपये असे अठ्यान्नव लाख साठ हजारांचे कर्ज बँकेमार्फत वितरित केले. दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ३० बचत गटांना एक कोटी एकेचाळीस लाख त्रेचाळीस हजारांचे व्यावसायिक कर्ज वितरित केले. नऊ बचत गटांना ९० हजारांचा फिरता निधी वितरित केला. या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी केले.