आमदार ऋतूराज पाटील वाढदिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार ऋतूराज पाटील वाढदिवस
आमदार ऋतूराज पाटील वाढदिवस

आमदार ऋतूराज पाटील वाढदिवस

sakal_logo
By

05966

आमदार ऋतुराज पाटील यांच्या
वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

कोल्हापूर, ता. ३० ः येथील डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (बुधवारी) विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.
कोरोनाच्या संकटाच्या काळातही जनतेशी सतत संपर्कात राहून त्यांनी अडीअडचणी सोडवण्यात आमदार पाटील नेहमीच आघाडीवर होते. दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वसामावेशक विकासाचा ध्यास घेऊन ते कार्यरत आहेत. गांधीनगरसह तेरा गावातील पिण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तब्बल ३४३ कोटी रुपयांची सुधारित गांधीनगर नळपाणी योजना त्यांनी मंजूर करून आणली आहे. तीन वर्षाच्या काळात कोट्यवधीची विकासकामे त्यांनी केली आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आमदार पाटील सकाळी नऊ ते बारा या कालावधीत अजिंक्यतारा कार्यालयात उपस्थित राहणार असून, सायंकाळी सहा ते नऊ या कालावधीत डी. वाय. पाटील कॉलेज (साळोखेनगर) येथे ते नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारतील. दुपारच्या कालावधीत रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, बॅडमिंटन स्पर्धा, फळे वाटप यासह विविध उपक्रम होणार असल्याचे वाढदिवस समितीने दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.