रायझिंग स्टार फुटबॉल स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायझिंग स्टार फुटबॉल स्पर्धा
रायझिंग स्टार फुटबॉल स्पर्धा

रायझिंग स्टार फुटबॉल स्पर्धा

sakal_logo
By

06146
कोल्हापूर : रायझिंग स्टार फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या १५ व १८ वर्षांखालील संघांना पारितोषिक देताना मान्यवर.

रायझिंग स्टार फुटबॉल स्पर्धेचे
१५, १८ वर्षांखालील गटाला विजेतेपद
कोल्हापूर, ता. ३१ : छत्रपती शिवाजी स्टेडियमवर फुटबॉल प्रशिक्षण शिबिर व रायझिंग स्टार फुटबॉल स्पर्धा झाली. स्पर्धेत शिबिरातून निवड झालेल्या १५ वर्षांखालील व १८ वर्षांखालील गटांनी विजेतेपद पटकावले. शिवाजी स्पोर्टस् ॲकॅडमीतर्फे फुटबॉल शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोनशे विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवला होता. शेवटच्या पाच दिवसांत शिबिरार्थी खेळाडूंच्या विविध संघांत रायझिंग स्टार फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली. यांतील १५ आणि १८ वर्षे वयोगटांतील मुलांच्या विजेत्या संघांना चषक, तसेच उत्कृष्ट खेळाडूंना सायकल असे बक्षीस मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते व महान भारत केसरी विनोद चौगुले, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, अभिषेक बोंद्रे, माणिक मंडलिक यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी संयोजकांतर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या वस्ताद पंडित पोवार, जाफर बाबा, चंद्रकांत साळोखे, हिल रायडर्सचे प्रमोद पाटील, दिलीप माने, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक शरद माळी, स्विमिंग प्रशिक्षक प्रभाकर डांगे, तुषार देसाई, हवालदार राहुल माळी, संपत जाधव यांचा गौरव करण्यात आला. शिवाजी स्टेडियमवर कार्यरत असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रसाद संकपाळ व त्यांचे पथक, पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड, योद्धा कमांडो ॲकॅडमी आणि रेस्क्यू फोर्सचे सुभेदार आर. एस. पाटील, हवालदार संजय आबिटकर, शिवकालीन युद्धकला प्रशिक्षक शीतल ढोली, तसेच खुशी कांबोज यांचा सत्कार करण्यात आला. १५ वर्षांखालील गटातील गुणवंत खेळाडू शार्दव फराकटे, पृथ्वी थोरात, प्रथमेश गुजर, धनंजय जाधव, तर १८ वर्षांखालील गटातील यश जांभळे, विवेक सिंह पाटील, देवराज जाधव, करण सूर्यवंशी या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सायकल प्रदान करण्यात आली.