जुना बुधवार चा उपांत्यफेरीत प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुना बुधवार चा उपांत्यफेरीत प्रवेश
जुना बुधवार चा उपांत्यफेरीत प्रवेश

जुना बुधवार चा उपांत्यफेरीत प्रवेश

sakal_logo
By

लोगो - अटल चषक फुटबॉल स्पर्धा
06215
कोल्हापूर : तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत जुना बुधवार विरुद्ध पाटाकडील (बी) यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

‘जुना बुधवार’चा उपांत्यफेरीत प्रवेश
पाटाकडील ब संघावर मात; आक्रमक खेळी थोपवली
कोल्हापूर, ता. ३१ : संयुक्त जुना बुधवार पेठ संघाने पाटाकडील तालीम मंडळ - ब संघावर २ विरुद्ध ० गोल फरकाने विजय मिळवत उपांत्यफेरीत प्रवेश केला. अटल चषक फुटबॉल स्पर्धेतील सामना छत्रपती शाहू स्टेडियमवर झाला.
पावसाच्या व्यत्ययानंतर झालेल्या सामन्यात जुना बुधवार संघाचे वर्चस्व राहिले. सामन्यात आक्रमक सुरुवात करत पीटीएम ब संघाने जुना बुधवार संघावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र जुना बुधवार संघाच्या बचाव फळीने अनेक आक्रमणे थोपवले. यानंतर जुना बुधवार संघाकडून लॉँग पास करत सामन्यात रंगत आणली. जुना बुधवारच्या या खेळीमुळे पीटीएम ब संघ विखुरला गेला. यात आक्रमणे वाढवत जुना बुधवार संघाने गोलसाठी प्रयत्न केला मात्र पूर्वार्धात दोन्ही संघाना गोल नोंदवणे शक्य झाले नाही.
उत्तरार्धात पीटीएम ब कडून आक्रमक चढाया झाल्या. मात्र जुना बुधवार संघाची बचाव फळी उभी राहिली. सामन्याच्या ६८ व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर इमॅनुअल याने गोल नोंदवत जुना बुधवार संघाला एक गोलने आघाडी मिळवून दिली. यानंतर थोड्याच वेळात रिचमंड अवेटी याने दिलेल्या लॉँग पासवर इमॅनुअल याने हेडद्वारे गोल नोंदवत सामना २ - ० असा केला. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहत सामना जुना बुधवार संघाने जिंकला.
------
आजचा सामना
संध्याकाळी ४ श्री शिवाजी मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस क्लब
----------
सामनावीर
इमॅनुअल
---------
लढवय्या
गुरुराज काटकर