आडसूळ अतिरिक्त आयुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आडसूळ अतिरिक्त आयुक्त
आडसूळ अतिरिक्त आयुक्त

आडसूळ अतिरिक्त आयुक्त

sakal_logo
By

06242

रविकांत आडसूळ
अतिरिक्त आयुक्तपदी
कोल्हापूर, ता. ३१ ः महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी रविकांत आडसूळ यांची आज शासनाने प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली. दोन वर्षाच्या कालावधीसाठी ही नियुक्ती केली आहे. त्यामुळे रिक्त उपायुक्तपदी नवीन अधिकारी येणार आहे.
नितीन देसाई यांच्या निवृत्तीमुळे अतिरिक्त आयुक्तपद रिक्त झाले. त्यांचा अतिरिक्त कार्यभार कोणा अधिकाऱ्याकडे दिला जाण्याची चर्चा होती.सायंकाळी उपायुक्तपदी असलेल्या आडसूळ यांची प्रतिनियुक्तीने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केल्याचे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाने काढले. प्रतिनियुक्ती करताना त्यात काही अटी घातल्या आहेत. आडसूळ यांची नेमणूक उपायुक्तपदी असली तरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी या निवडश्रेणीत होते. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तपदी त्यांची नेमणूक झाली. आडसूळ यांनी जिल्हा परिषदेमध्ये काम केले आहे. त्यांच्या नियुक्तीने उपायुक्तपद रिक्त झाले असून लवकरच त्या पदावर नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे.