
विज्ञानवादी विचारांचा अंगीकार करा
gad16.jpg
06380
हेब्बाळ जलद्याळ : पांडुरंग करंबळकर यांचा अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते सत्कार झाला. प्रा. सुभाष कोरे, अलका भोईटे, प्रकाश भोईटे उपस्थित होते.
----------------------------
विज्ञानवादी विचारांचा अंगीकार करा
डॉ. श्रीमंत कोकाटे; पांडुरंग करंबळकर यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : स्त्री ही सृजनशील आहे. नवनिर्मितीची प्रचंड क्षमता स्त्रियांकडे आहे. पण, पुरुषी अन्याय, अत्याचार ती सहन करीत आली आहे. या अर्थाने गुलामीची सुरुवात ही महिलांपासून होते. सर्वांनी सत्यशोधक विचारांची जोपासना करून अंधश्रद्धेला फाटा देऊन पुरोगामी व विज्ञानवादी विचारांचा अंगीकार करावा, असे आवाहन डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केले.
हेब्बाळ जलद्याळ (ता. गडहिंग्लज) येथे पांडुरंग करंबळकर यांचा अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. विलास पोवार अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे, माजी प्राचार्य जे. बी. बारदेस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. कोकाटे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया या अमावस्येच्या रात्री यशस्वी केल्या. तर राजर्षी शाहू महाराज यांनी भविष्य सांगायला आलेल्या ढोंगी साधूला त्यांनी डांबून ठेवले होते. याचे चिंतन सर्वांनी करावे. करंबळकर गुरुजींनी आयुष्यभर अनेक चळवळी केल्या. सत्यशोधक चळवळीपासून ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले आहे.’
प्रा. सुभाष कोरे यांनी स्वागत केले. प्रा. प्रकाश भोईटे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. अॅड. शिंदे, श्री. बारदेस्कर यांचीही भाषणे झाली. प्राचार्य कल्याणराव पुजारी, अजित शिंदे-नेसरीकर, सुरेश मटकर, विद्याधर गुरबे, बी. जी. काटे यांच्यासह चळवळीतील कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. अश्विनी पाटील व अशोक मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यकांत देसाई यांनी आभार मानले.