प्रभात तुतारी पुजन सोहळा

प्रभात तुतारी पुजन सोहळा

06352
कोल्हापूर : ‘प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त कोळेकर तिकटी येथे ज्येष्ठ रंगकर्मींनी तुतारीचे पूजन केले.

‘प्रभात’च्या तुतारीचे
वर्धापनदिनी पूजन
कोल्हापूर, ता. १ : प्रभात फिल्म कंपनीच्या ९४ व्या वर्धापनदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे ज्येष्ठ रंगकर्मींच्या हस्ते प्रभात तुतारी शिल्पाचे पूजन करण्यात आले. प्रभात शिल्पाचे पूजन निर्माते- दिगदर्शक विजय शिंदे यांच्या हस्ते व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे प्रमुख कार्यवाह रणजित जाधव, संचालक सतीश बिडकर, मिलिंद अष्टेकर, इम्तियाज बारगीर, बाळकृष्ण बारामती, सदानंद सूर्यवंशी, सर्जेराव पाटील, अनिल काशीकर, बबीता काकडे, शोभा शिराळकर, अशोक माने, संग्राम भालकर, केदार आंबले, मंगेश मंगेशकर, उदयराज वडामकर, हणमंत जोशी, अशोक सूर्यवंशी, उत्तम गणेशाचार्य, बबन बिरंजे, रवींद्र बोरगावकर, नम्रता आरडे -गोडबोले, सिद्धेश मंगेशकर, अरुण पाटील उपस्थित होते.
दिग्दर्शक विजय शिंदे म्हणाले, ‘‘भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहास घडविणारे महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती संस्था स्थापना १ जून १९२९ मध्ये कोल्हापुरात विष्णुपंत दामले, व्ही. शांताराम, केशवराव धायबर या दिग्गजांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. या कंपनीने गोपालकृष्ण खुनीखंजीर उदयकाल, चंद्रसेना, जुलूम अशा अनेक मुखपटाची निर्मिती केली. १९३२ मध्ये अयोध्याचा राजा या बोलपटाची निर्मिती केली. त्यानंतर अनेक मराठी हिंदी चित्रपटांची निर्मिती केली. याचे स्मरण करण्यासाठी प्रभात फिल्म कंपनीची तुतारी या शिल्पाची पूजन दरवर्षी अखिल भारतीय चित्रपट महामंडळार्ते साजरी करण्यात येते.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com