
गडहिंग्लजला अहिल्यादेवी होळकर जयंती
GAD19.JPG
06359
गडहिंग्लज : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन बाबासाहेब वाघमोडे यांच्याहस्ते झाले. गजानन सरगर, स्वरुप खारगे, सिद्धार्थ बन्ने, डॉ. एम. एस. बेळगुद्री, विठ्ठल भम्मानगोळ उपस्थित होते.
-----------------------------------------------------
गडहिंग्लजला अहिल्यादेवी होळकर जयंती
गडहिंग्लज, ता. १ : येथील धनगर समाज बांधवांतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. मुख्य रस्त्यावरील सुपर मार्केटजवळच्या अहिल्यादेवी होळकर चौकात हा कार्यक्रम झाला.
पोलिस निरीक्षक गजानन सरगर, पालिकेचे मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आम्ही गडहिंग्लजकर या सर्वधर्मीय संघटनेतर्फे देशभक्तीपर पोवाडे गाण्यात आले. यामुळे कार्यक्रमाची उंची वाढली. धनगर समाज बांधवांसह महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर पेढे व केळी वाटप केले. सिद्धार्थ बन्ने व विठ्ठल भमानगोळ यांनी नियोजन केले. माजी नगराध्यक्षा निरुपमा बन्ने, अरुणा शिंदे, भारती पुजारी, पुनम म्हेत्री, रियाज शमनजी, रामाप्पा करीगार, डॉ. एम. एस. बेळगुद्री, अरुण कलाल, सुभाष पुजारी, आप्पासाहेब कट्टीकर, सर्जेराव नडट्टी आदी उपस्थित होते.