
रेशन निवेदन बातमी
रेशनवरील गव्हाची आवक
वाढवून देण्याची मागणी
कोल्हापूर, ता. १ ः कोल्हापूर जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांना जून महिन्याच्या वितरणातील गहू कमी आला. त्यामुळे ग्राहकांना गहू वितरीत करता आला नाही. तो गहू वाढवून मिळावा, अशी मागणी जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली. जिल्हा पुरवठा अधिकारी सरस्वती पाटील यांना याबाबतचे निवेदन दिले.
जिल्ह्यातील सर्व रेशन धान्य दुकानदारांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. कोरोना काळात दुकानदारांना आपला जीवही गमवावा लागला, परंतु शासनाकडून या दुकानदारांना कोणती आर्थिक मदत अद्याप दिली गेली नाही. असे असतानाही रेशन धान्य दुकानदार शासनाच्या नियमाचे पालन करत जनतेपर्यंत सेवा पुरवत आहेत. जूनमध्ये शासनाने जिल्ह्यासाठी पाठवलेला गहू हा कमी असून, तो नियमाप्रमाणे मिळाला पाहिजे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळात अशोक सोलापुरे, राजेश मंडलिक, गजानन हवलदार, अरुण शिंदे, दीपक शिराळे, बाबासो पाटील, भगवानराव घोरपडे, सुरेश पाटील उपस्थित होते.