इचल ः हद्दपार गुन्हेगार अटक

इचल ः हद्दपार गुन्हेगार अटक

ich13.jpg 06428
इचलकरंजी ः हद्दपार गुन्हेगार सलमान नदाफ याला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले.

लाकूड ओढण्याच्या शर्यती पाहण्यासाठी
आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला

इचलकरंजीत हद्दपार गुन्हेगारास अटक; दोन दिवसांची पोलिस कोठडी

इचलकरंजी, ता.१ ःघरात घुसून कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यासह घरावर दगडफेक केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सलमान राजू नदाफ (रा. गावभाग) याला अटक केली. हद्दपारीची कारवाई केली असतानाही त्यांने हा गुन्हा करण्याचे धाडस करीत पोलिसांनाच आव्हान दिले होते. घटनेनंतर तो पसार होता. पण, शहरात लाकूड ओढण्याच्या शर्यती पाहण्यासाठी तो आला होता. त्याची माहिती मिळताच तत्काळ हालचाली करत त्याला पोलिसांनी जेरबंद केले.
गावभाग परिसरात राहणारा सलमान नदाफ हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याने गावभाग पोलिसांकडून त्याच्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे. हद्दपार असतानाही सलमान नदाफ याने दोन अल्पवयीन साथीदारांसह 22 मे रोजी गावभागातील नरसोबा कट्टा परिसरात राहणा‍ऱ्या सुनिल लंगोटे याच्या घरात घुसला. त्यावेळी चार महिन्यांपूर्वी झालेल्या अपघाताचा वाद मिटवल्याचा जाब विचारत सलमान याने कोयताचा धाक दाखवित सुनिल याला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कुटुंबीयांना शिवीगाळ केली, तर सलमान याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन साथीदारांनी लंगोटे याच्या घरावर दगडफेक करत प्रापंचित साहित्याचे नुकसान केले. या प्रकरणी दहशत माजविण्यासह शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लंगोटे याच्या तक्रारीनंतर दोन अल्पवयीनांसह सलमान नदाफ अशा तिघांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, या घटनेनंतर सलमान पसार झाला होता. त्याचा ठावठिकाणा पोलिसांना मिळत नव्हता. पण, लाकूड ओढण्याच्या शर्यती पाहण्यासाठी आला आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.


ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com