कलातपस्वी सूर्यकांत मांडरे

कलातपस्वी सूर्यकांत मांडरे

65238
कलातपस्वी सूर्यकांत मांडरे
कलातपस्वी सूर्यकांत मांडरे मराठी चित्रपटसृष्टी, तसेच नाट्य रंगभूमी गाजवणारे म्हणजे माझे आजोबा (पप्पाजी) यांची आज (दोन जून) जयंती. ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा रेखाटल्या. त्या पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी ‘ध्रुव’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. ‘छत्रपती शिवाजी महाराज’, ‘वारणेचा वाघ’, ‘साधी माणसं’मधील त्यांच्या भूमिका अजरामर झाल्या. त्यांच्या रांगड्या व देखण्या रूपाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. ते एक उत्तम चित्रकार तसेच लेखक म्हणूनही लोकांपर्यंत पोहोचले. त्यांच्या धाकटी पाती, कोल्हापुरी साज, विश्वकर्मा या पुस्तकांना नावलौकिक मिळाला. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले; पण त्याचा त्यांना कधी गर्व नव्हता. ते कायम जमिनीवर आपल्या माणसांना धरून राहत. त्यांच्यावर भालजी पेंढारकरांची शिस्त व संस्कार होते. त्यांना ‘ना मानाचा, ना पैशाचा’ हव्यास होता. त्यांना कुठे थांबले पाहिजे, हे माहीत होते. त्यांनी स्वतःहून चित्रपटामधून संन्यास घेतला व आपला छंद जोपासत कुटुंबीयांबरोबर वेळ घालवणे पसंत केले. ते माझे आजोबाच नव्हे, तर माझे मित्रही होते. माझे काका व बाबा त्यांच्यासमोर जाताना दबकून असायचे; पण मी पप्पाजी यांना गणपतीला घरात देवासमोर हट्ट करून माझ्याबरोबर फुगडी घालायला भाग पाडायचे. अशा अनेक आठवणी आजही मनात रेंगाळतात आणि डोळे भरून येतात. त्यांच्या जयंतीनिमित्त एक इच्छा आहे की त्यांचे चित्रसंग्रहालय शिवाजी विद्यापीठाने लवकरात लवकर त्यांच्या चाहत्यांसाठी सुरू करावे आणि त्याची स्वप्नपूर्ती व्हावी.
- सौ. स्वरूपा मांडरे-पोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com