
तर्कतीर्थ ग्रंथासाठी आवाहन
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री
जोशी यांच्या साहित्याबाबत आवाहन
कोल्हापूर, ता. २ ः राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाडःमय'' संपादन व प्रकाशन प्रकल्प हाती घेतला आहे. त्याची जबाबदारी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्यावर सोपवली आहे. तर्कतीर्थांच्या साहित्याबरोबरच त्यांच्या मुलाखती, त्यांच्या साहित्य, व्यक्ती, विचार, जीवनासंबंधी विविध साहित्यिक, समीक्षकांचे लेख, समीक्षा प्रकाशित केले जाणार आहे. मात्र संबंधित साहित्यिक व समीक्षकांनी किंवा त्यांच्या वारसांनी हे साहित्य प्रकाशित करण्यासाठी परवानगी देणे आवश्यक आहे. संबंधितांनी ही परवानी द्यावी, असे आवाहन डॉ. लवटे यांनी केले आहे.
श्री. शं. नवरे, दि. वि. देव, व्दा.भ. कर्णिक, प्रा. गोवर्धन पारीख, मा. पं. मंगुडकर, भाई माधवराव बागल, मे. पुं. रेगे, अनिल डोंगरे, दिनकर साक्रीकर, श्री. ग. माजगावकर, माधव गडकरी, कमल कुलकर्णी, डॉ. यु. म. पठाण, रविंद्र पिंगे, एस. डी. इनामदार, सुभाष भेंडे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्रा. य. दि. फडके, मीनल भावे, गोविंद तळवलकर, शरद बेडेकर, प्राचार्य राम शेवाळकर, डॉ. मो. गो. धडफळे, चंद्रशेखर मराठे, वि. र. काळे, डॉ. शं. रा. तळघट्टी, चिं.ग. काळीकर, म. शं. ढोले, न. चिं. केळकर, प्रा. देवीदास वाडेकर, सदाशिवशास्त्री भिडे, डॉ. के. ल. दप्तरी, ना. गो. चाफेकर, गो. रा. राजोपाध्ये, वि. वि. दिक्षित, दुर्गा भागवत, पु. शि. रेगे, म. अ. मेहेंदळे, डॉ. वि. भि. कोलते, शंकर सारडा, प्रा. अरूण कांबळे, वा. म. कुलकर्णी, श्रीनिवास दिक्षीत, शि. स. अंतरकर, प्र. म. बांदिवडेकर, डॉ. मु. श्री. कानडे आदींचा या साहित्यिक व समीक्षकांमध्ये समावेश आहे. अधिक माहितीसाठी डॉ. सुनीलकुमार लवटे, ‘निशांकूर’, अयोध्या वसाहत, राजीव गांधी महामार्ग, सुर्वेनगर कोपरा, डाकघर, कळंबा, कोल्हापूर या पत्त्यावर संपर्क साधावा.