आरटीओ कार्यालयाच्या जागेची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीओ कार्यालयाच्या जागेची पाहणी
आरटीओ कार्यालयाच्या जागेची पाहणी

आरटीओ कार्यालयाच्या जागेची पाहणी

sakal_logo
By

ich22.jpg
06571
इचलकरंजी ः आरटीओ कार्यालयासाठी जागेची पाहणी आमदार प्रकाश आवाडे, अधिकारी दीपक पाटील, आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पाहणी केली.
----------
आरटीओ कार्यालयाच्या जागेची पाहणी
आमदार आवाडेंसह अधिकाऱ्यांची उपस्थिती; शाळा क्रमांक १२ ची इमारत निश्चित
इचलकरंजी, ता. २ ः इचलकरंजी येथे नव्याने मंजूर झालेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी सम्राट अशोकनगर परिसरातील महापालिका मालकीची सध्या वापरात नसलेली महात्मा जोतिबा फुले विद्या मंदिर क्रमांक १२ या शाळेची इमारत निश्चित केली आहे. या जागेची आमदार प्रकाश आवाडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, राहुल आवाडे आदींनी केली.
जिल्ह्यातील इचलकरंजीची हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. शहराचा वाढता विस्तार व भौगोलिक परिस्थिती व हातकणंगले आणि शिरोळ या दोन तालुक्यांतील वाहनाची संख्या लक्षात घेऊन इचलकरंजी येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु व्हावे यासाठी आमदार आवाडे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. त्याला यश येऊन इचलकरंजीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास नुकतीच मंजूरी मिळाली आहे. त्यानंतर लवकरात लवकर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु होण्यासाठी आमदार आवाडे प्रयत्नशील आहेत. त्यादृष्टीने शुक्रवारी मान्यवरांनी त्यासाठी आवश्यक जागेची पाहणी केली. त्यानुसार क्रांती गारमेंट प्रशिक्षण केंद्र व महात्मा जोतिबा फुले विद्या मंदिर क्रमांक १२ या शाळेची इमारतीची पाहणी केले. त्यामध्ये शाळा क्रमांक १२ ची बंद असलेली इमारत कार्यालयासाठी योग्य असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी सांगितले. आयुक्त सुधाकर देशमुख यांनीही त्याला मंजुरी दिली. प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, दीपक सुर्वे, राजू बोन्द्रे, नरसिंह पारीक, नितेश पोवार, राहुल घाट, दिलीप मुथा, सुहास कांबळे, आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, शहर अभियंता संजय बागडे उपस्थित होते.
0---
कामगार कल्याण मंडळाची जागा घेणार
शाळा क्रमांक १२ लगत कामगार कल्याण मंडळाची इमारत आहे. आरटीओ कार्यालयासाठी गरज लागल्यास मंडळाच्या इमारत परिसरातील काही जागा गरज पडल्यास वापरात घेण्यात येईल, असेही आमदार आवाडे यांनी सांगितले. यामुळे या परिसरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय लवकरच सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.