जाहिरात- डीवायपी व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात- डीवायपी व्याख्यान
जाहिरात- डीवायपी व्याख्यान

जाहिरात- डीवायपी व्याख्यान

sakal_logo
By

डॉ. डी वाय पाटील
पॉलिटेक्निकतर्फे उद्या कार्यशाळा
कोल्हापूर, ता. २ ः कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकतर्फे ‘दहावीनंतरच्या करिअर संधी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया’ या विषयावर रविवारी (ता. ४) मार्गदर्शनपर कार्यशाळा होणार आहे. कसबा बावडा येथे पॉलिटेक्निकच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी साडेनऊला ही कार्यशाळा होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले आहे.
दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला. दहावीनंतर नेमके कोणत्या क्षेत्रात जायचे? याबद्दल विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्याही मनात अनेक प्रश्न असतात. ही गोष्ट ध्यानात घेऊनच डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकतर्फे दहावीनंतरच्या करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत? करिअर क्षेत्र कसे निवडावे? याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याबरोबरच डिप्लोमा इंजिनियरिंग प्रवेश प्रक्रिया कशाप्रकारे होते, प्रवेशासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, शासनाच्या वतीने कोणकोणत्या स्कॉलरशिप दिल्या जातात, याबद्दलही कार्यशाळेत माहिती दिली जाणार आहे. कार्यशाळेमध्ये प्राचार्य डॉ. नरके यांच्यासह ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. नितीन माळी मार्गदर्शन करणार आहेत.