
खासदार धनंजय महाडिक
जिल्हाभरातील रस्त्यांच्या
कामासाठी तीस कोटींचा निधी मंजूर
खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक यांचा पाठपुरावा
कोल्हापूर, ता. २ ः खासदार धनंजय महाडिक व माजी आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक या योजनांच्या माध्यमातून तीस कोटी साठ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर हातकणंगले व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
तासगाव ते सिधोबा देवालय, भेंडवडे ते इतर जिल्हा मार्ग, कुंभोज ते सकलतपीर नरंदे, रुकडी ते वसगडे नदी रस्ता, रुकडी ते पट्टणकोडोली रस्ता, चोकाक ते रुकडी रस्ता, कोल्हापूर शहर ते हणमंतवाडी, शिंगणापूर, निगवे दुमाला ते ट्रेनिंग कॉलेज, राज्य महामार्ग क्रमांक ९४ ते कावणे रस्ता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ उचगाव ते मुडशिंगी रस्ता, चिंचवाड जैन मंदिर ते वळिवडे रस्ता, इतर जिल्हा मार्ग ७४ ते आर.के. नगर, गोकुळ शिरगाव ते चित्रनगरी रस्ता, दऱ्याचे वडगांव ते वड्डवाडी रस्ता, वसगडे ते रुकडी रस्ता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ते कणेरीवाडी, ग्रामीण मार्ग क्रमांक १०१ पासून वसगडे हायस्कूल ते इतर जिल्हा मार्ग ७७ ला मिळणारा रस्ता आदी कामांसाठी निधी मंजूर झाला आहे.