
शरद पॉलिटेक्निकच्या १६ विद्यार्थ्यांची निवड
शरद पॉलिटेक्निकच्या १६ विद्यार्थ्यांची निवड
दानोळी, ता. ४ ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकच्या १६ विद्यार्थ्यांची ल्युमॅक्स इंडिया कंपनीत निवड झाली आहे. यामध्ये मेकॅनिकलच्या अब्दुल उस्मान, असिम सुतार, भरत कुमार, गुरफान सलिम, रणजित कुमार, सचिन कुमार, विकास यादव, महमंदकैफ मोमिन, इलेक्ट्रीकल विभागातील धर्मवीर खोत, हमिद जमादार, राहुल पुजारी, साक्षी सासणे, शुभम माळी, स्वप्निल खोत, वेदांत कदम इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विकास कुमार या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
ल्युमॅक्स इंडिया हि देशातील अग्रेसर अॅटोमोबाईल लायटनिंग, गिअर शिप्टर, एल.आ.डी. लायटनिंग, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स कंपोटन्स व टु व्हिलर चेसीस बनवण्याचे काम करते. कंपनीचे फ्रान्स व जपान यासह देशात ३७ व राज्यात चाकण व चिंचवडमध्ये ग्लोबर सेंटर आहेत. भारतात सहा ठिकाणी डिझाईन आणि इंजिनिअरिंग सेंटर आहेत.
महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल अॅप्टीट्युड ट्रेनिंग, टेक्निकल स्कीलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यु यासह टेक्निकल सेशन, व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम, कंपनी स्पेसीपीक ट्रेनिंग, अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तंज्ञामार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबवले जातात. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना या कॅम्पससाठी झाला. तसेच सध्या इंडस्ट्रीमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना चांगली मागणी असल्याची माहीती ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाने दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. प्राचार्य बी. एस. ताशीलदार, ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रा. अभिजित केकरे, प्रा. नेहा सोनी आदींचे सहकार्य लाभले.