आवश्यक- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक- संक्षिप्त पट्टा
आवश्यक- संक्षिप्त पट्टा

आवश्यक- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

06462
विशाल राजस यांनी साकारलेली कलाकृती.
राजस यांच्या शिल्पाकृतींचे आजपासून प्रदर्शन
कोल्हापूर : विशाल राजस यांच्या शिल्पाकृतींचे प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवन कलादालनात रविवार (ता. ४) पासून आयोजित केले जाणार आहे. शनिवार (ता. १०) पर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत ते खुले राहणार असून, या प्रदर्शनात फायबर माध्यमातील २४ कलाकृतींचा समावेश आहे. यामध्ये प्राण्यांचा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पांचा समावेश आहे. या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन विशाल राजस यांनी केले आहे.
-------
06466
कोल्हापूर : मैफिलीत गीत सादर करताना भाग्येश मराठे.

घराणेदार गायनाची
आनंददायी मैफल
कोल्हापूर : आकारयुक्त आवाजाचा सुरेल लगाव, राग स्वरूपाची पद्धतशीर बढत, समेवर येण्याचा डौल, चपळ तानक्रिया यांचा मिलाफ घडवत भाग्येश मराठे यांनी घराणेदार गायकीचे आनंददायी दर्शन घडविले. निमित्त होते, गेल्या पिढीतील जयपूर घराण्याचे कलाकार व गुरू आनंदराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गायन समाज देवल क्लबतर्फे आयोजित केलेल्या विशेष सायंकालीन संगीत सभेचे.
भाग्येश यांनी मैफलीची सुरुवात जयपूर घराण्याची खासीयत मानल्या गेलेल्या राग ‘नंद’मधील ‘धुंडू बारे सैया’ या विलंबित त्रितालातील ‘आजहून आये’ ही रचना सादर केल्यानंतर ‘हिंडोल बहार’ या जोडरागातील बंदिश सादर करून संगीतप्रेमी रसिकांची दाद मिळवली. त्यानंतर ‘नट बिहाग’मधील बंदिश, टप्पा अंगाची काफी रागातील रचना ‘हरी मेरो जीवन प्राण आधार’ हे नाट्यगीत व रंग दे रंग दे ही भैरवी सादर करून दोन तासांहून अधिक काळ रंगलेल्या स्वर मैफलीची सांगता केली. प्रणव गुरव व स्वरूप दिवाण यांनी तबला व हार्मोनियमची साथ दिली. देवल क्लबचे श्रीकांत डिग्रजकर यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ शास्त्रीय संगीत कलाकार पंडित अरुण कुलकर्णी, दिलीप गुणे यांनी स्वागत केले. यावेळी वासंती टेंबे, सुखदा काणे, सुबोध गद्रे, स्नेहा राजुरीकर, पंडित सुधीर पोटे, विनोद डिग्रजकर, वंदना आठल्ये उपस्थित होते.
--------------
सावंत ॲकॅडमीतर्फे
आज करिअर मार्गदर्शन
कोल्हापूर ः येथील सावंत ॲकॅडमी व सावंत कोचिंग क्लासेसतर्फे ‘पालकांची आशा व विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा’ या विषयावर ॲकॅडमीचे संस्थापक प्रा. एम. बी. सावंत यांचे मार्गदर्शन होणार आहे. उद्या (ता. ४) कुडित्रे येथील कुंभ- कासारी साखर कारखान्यासमोरील शेतकरी सांस्कृतिक भवनात सकाळी साडेनऊला हा कार्यक्रम होणार असून, विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ॲकॅडमीने केले आहे. दहावी-बारावीनंतर नेमके काय करावे, अशी संभ्रमावस्था पालक व विद्यार्थ्यांत आहे. मात्र, सहावीपासूनच जर नियोजन केले तर ही संभ्रमावस्था राहत नाही. हे नियोजन कसे करावे, दहावी-बारावीनंतर करिअरचे विविध पर्याय कुठले आहेत, अशा विविध अंगांनी कार्यक्रमात मार्गदर्शन होणार आहे.
-------------
06806
कोल्हापूर : भारताचे पहिले ऑलिंपिकवीर मल्ल दिनकरराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात प्रतिमेचे अनावरण झाले.

दिनकरराव शिंदेंच्या तैलचित्राचे अनावरण
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील दिनकरराव शिंदे, हेच भारताचे पहिले ऑलिंपिकवीर मल्ल होते, असे स्पष्ट मत बाबा महाडिक यांनी व्यक्त केले.
दिनकरराव शिंदे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण होते.
शिवाजी तरुण मंडळाजवळील चौकाला पूर्वी दिनकरराव शिंदे यांचे नाव महानगरपालिकेने दिले होते. त्याच्या नोंदीही आहेत. कालांतराने तेथील फलक निघाला असला तरी आता तो पुन्हा लावून त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवल्या पाहिजेत, अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाल्या. यावेळी शरद शिंदे, विजय शिंदे, मिलिंद यादव, माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, राम यादव, सुहास पाटील, शैलेश चव्हाण, श्रीकांत भोसले, केरबा सुतार, विश्व शिंदे, सुखदेव सुतार आदी उपस्थित होते.
..............
७४२७६ ही बातमीही घ्यावी..