Thur, Sept 21, 2023

आजरा ः कोवाडे सरपंच निवड बातमी
आजरा ः कोवाडे सरपंच निवड बातमी
Published on : 3 June 2023, 3:42 am
ajr34.jpg... संतोष चाैगुले
...
कोवाडेच्या सरपंचपदी संतोष चौगुले
भादवण ः मौजे कोवाडे (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संतोष रंगराव चौगुले यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी प्रकाश जोशीलकर होते. मावळते सरपंच मनोहर गुंडू जगदाळे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. मनोहर जगदाळे यांनी सरपंचपदासाठी श्री. चौगुले यांचे नाव सुचविले. यावेळी उपसरपंच वंदना देसाई, ग्रामपंचायत सदस्या रेश्मा सावंत , किरण साळी, सोनाबाई हुंदळेकर, गीता देसाई, धनाजी सावंत, शिवाजी देवेकर, गणपती घोळसे, बाळू बांदेकर, रघुनाथ गुरव आदी उपस्थित होते. ग्रामसेवक संतोष कुंभार यांनी आभार मानले.