Mon, Sept 25, 2023

निवड
सृष्टी भोसलेची निवड
निवड सृष्टी भोसलेची निवड
Published on : 3 June 2023, 4:25 am
6889
...
सृष्टी भोसलेची दिल्लीतील स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूरः राष्ट्रीय शालेय स्पर्धा २०२३ स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया स्पर्धेत कोल्हापूरच्या सृष्टी संदीप भोसले हिची ब्रेस्ट स्ट्रोक या जलतरण प्रकारामध्ये निवड झाली. दिल्ली येथे ५ ते १२ जून या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. सृष्टी सध्या बालेवाडीतील क्रीडा प्रबोधनीमध्ये क्रीडा शिक्षक बालाजी केंद्रे यांच्याकडे जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहे. ती सध्या बारावीला असून वयाच्या सहाव्या वर्षापासून ती पोहण्याचा सराव करते. गतवर्षी ओरिसा येथे तिला राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत रौप्यपदक मिळाले.