विनायक हायस्कूलचा शंभर टक्के निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनायक हायस्कूलचा शंभर टक्के निकाल
विनायक हायस्कूलचा शंभर टक्के निकाल

विनायक हायस्कूलचा शंभर टक्के निकाल

sakal_logo
By

विनायक हायस्कूलचा शंभर टक्के निकाल
इचलकरंजी : येथील विनायक हायस्कूल, शहापूर या शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. ९० टक्केपेक्षा जास्त सात विद्यार्थ्यांनी टक्केवारी काढली आहे. विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्षा सुमन शामराव चव्हाण, उपाध्यक्ष रवींद्र शामराव चव्हाण, सचिव अशोक शंकर चव्हाण आदींचे मार्गदर्शन लाभले.
.......
न्यू हायस्कूलचा ९४.९१टक्के निकाल

इचलकरंजी : दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा दहावीचा निकाल ९४.९१ टक्के लागला. यामध्ये प्रथम मानसी पाटील, द्वितीय मनस्वी पाटील, तृतीय क्रमांक प्रसन्न सातपुते यांनी मिळवला. ४३ विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. २३ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना अरुण खंजिरे, माजी मुख्याध्यापक एस. ए. पाटील, मुख्याध्यापक बी. ए. कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.
........
बालाजी विद्यालयाचा ९९.४० टक्के निकाल

इचलकरंजी : बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा दहावीचा निकाल ९९.४० टक्के लागला. यामध्ये प्रथम पायल शिंदे, द्वितीय हर्षवर्धन शितोळे आणि यश रावळ याने तृतीय क्रमांक पटकावला. १६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका एम. एस. रावळ व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
,...........
शाहू हायस्कूलचा निकाल ९३.७९ टक्के
इचलकरंजी : छत्रपती शाहू हायस्कूलचा दहावीचा निकाल ९३.४० टक्के लागला. यामध्ये प्रथम प्रगती शेटके, द्वितीय प्रिया सरोज, तृतीय क्रमांक श्रुती अंगडी यांनी पटकावला. १२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक शंकर पवार, विद्याधर भाट, अलका शेलार, राजेंद्र घोडके यांचे मार्गदर्शन लाभले.