
पारगड मॅरेथॉनमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
chd51.jpg
07196
पारगड ः मॅरेथॉन स्पर्धेतील विविध वयोगटातील विजेत्यांसह आमदार राजेश पाटील, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, बिपीन चिरमुरे, सरपंच संतोष पवार आदी उपस्थित होते.
----------------------------------------------------
पारगड मॅरेथॉनमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
आमदार राजेश पाटील; विविध वयोगटातील शेकडो स्पर्धकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ५ ः पारगड हेरिटेज रन यासारख्या मॅरेथॉन स्पर्धेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जातो ही प्रेरणादायी बाब आहे, असे मत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. बिपीन चिरमुरे अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व दिल्लीतून ३३० स्पर्धक सहभागी झाले होते. गडावरील भवनी मंदिरापासून स्पर्धेला सुरवात झाली. २१ किलो मीटर हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या गटात विवेक मोरे (दाटे), अनिकेत कुट्रे (चंदगड), परशराम भोई (गडहिंग्लज) तर महिलांमध्ये रोहीणी पाटील (गडहिंग्लज), भक्ती पोटे (गडहिंग्लज), प्रेयसी चारी (गोवा) यांनी अनुक्रमे तीन क्रमांक पटकावले. १० किलो मीटर जंगल ड्रीम रनमध्ये पुरुषांच्या गटात रोहीत रामा, युवराज वाकसे, अभिषेक नाईक तर महिलांमध्ये जानवी मोहनगेकर, डॉ. रुपा कापडीया यांनी यश मिळवले. पाच किलो मीटर जॉय ऑफ जंगलमध्ये विविध वयोगटात ईशांत कदम, जय मोहनगेकर, श्रीयश बिरिजे, अमृता पाटील, साक्षी दळवी, सिध्दी देवणे, महादेव पाटील, कार्तिक रुपनर, सौरभ शिंदे, वैशाली जांभळे, अंजना बागेवाडी, डॉ. सुजाता गावकर विजेते ठरले.
सामाजिक वनीकरण विभागाकडून सर्व सहभागी स्पर्धकांना पेरु, आवळा, काजू, फणस, आंबा, वड, पिंपळ जातीची रोपे देण्यात आली. पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, सरपंच संतोष पवार, वनपाल आर. वाय. पाटील, एन. जी. नागवेकर, रघुवीर शेलार, मारुती गावडे, भारत गावडे, पी. जे. मोहनगेकर, प्रकाश चिरमुरे आदी उपस्थित होते. प्रवीण चिरमुरे यांनी स्वागत केले. श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल शिंदे यांनी आभार मानले. उत्तम पवार यांनी सूत्रसंचालन केले.