Sun, October 1, 2023

संक्षिप्त
संक्षिप्त
Published on : 5 June 2023, 2:00 am
‘गझलच्या उजेडात
गझल’ कार्यक्रम
शनिवारी रंगणार
कोल्हापूर ः येथील गझलसाद संस्थेतर्फे ‘गझलच्या उजेडात गझल’ हा प्रसिद्ध कवी आणि ज्येष्ठ गझलकार चंद्रशेखर सानेकर (मुंबई) यांच्यासमवेत दिलखुलास गप्पांचा आणि गझलांचा कार्यक्रम होणार आहे. गणेश कुलकर्णी (मुंबई) संवादक असून, शनिवारी (ता. १०) सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल. साईक्स एक्स्टेन्शन परिसरातील जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या महालक्ष्मी हॉलसमोरील सुभाष नागेशकर यांच्या घरी हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘गझलसाद’चे निमंत्रक प्रा. नरहर कुलकर्णी यांनी केले.