Wed, October 4, 2023

जिल्हा परिषदेत उभारणार स्वराज्य गुढी
जिल्हा परिषदेत उभारणार स्वराज्य गुढी
Published on : 5 June 2023, 3:10 am
जिल्हा परिषदेत उभारणार स्वराज्य गुढी
कोल्हापूरः शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (ता.६) शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्हा परिषदेच्या आवारात शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारली जाणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. स्वराज्य गुढीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंच चिन्हांचा वापर केला जाणार आहे. यात भगवा ध्वज त्यावर महाराजांचा जिरेटोप, वाघनख्या, राजमुद्रा, सुवर्ण होन तसेच जगदंब तलवार अशी प्रतिके असणार आहेत. मंगळवारी सकाळी नऊ वाजता हा ध्वज फडकवून स्वराज्य गुढीला मानवंदना दिली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.