`डीकेटीई`ला देशपातळीवरील मानांकन

`डीकेटीई`ला देशपातळीवरील मानांकन

07480
‘डीकेटीई’ला देशपातळीवरील मानांकन
---
कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय; १०१ ते १५० च्या यादीत समावेश
इचलकरंजी, ता. ६ ः भारत सरकारने नुकतेच देशातील दर्जेदार उच्चशिक्षण संस्थांच्या जाहीर केलेल्या ‘एनआयआरएफ इन्व्होवेशन रॅकिंग-२०२३’ या शैक्षणिक मानांकन यादीत ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाईल ॲण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयास देशपातळीवर १०१ ते १५० या यादीत स्थान प्राप्त झाले आहे.
भारत सरकारच्या शिक्षण व परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री रंजन सिंग यांनी पुरस्काराची घोषणा केली. ‘एनबीए’चे चेअरमन डॉ. अनिल सहस्रबुद्धे, मेंबर सेक्रेटरी ऑफ एनबीए अनिलकुमार नासा आदी उपस्थित होते. देशभरातील १४०० हून अधिक उच्चशिक्षण संस्थांनी या मानांकनामध्ये सहभाग घेतला होता. कोल्हापूर जिल्ह्यातून ‘डीकेटीई’चे टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट या एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालयाचा या यादीत समावेश झाला आहे. देशपातळीवर ‘डीकेटीई’ने १०१ ते १५० या यादीत मानांकन जाहीर केले.
संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, खजिनदार प्रकाश दत्तवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे आदींचे मार्गदर्शन मिळाले. इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, डेप्युटी डायरेक्टर प्रा. डॉ. यू. जे. पाटील, नोडल ऑफिसर आणि इलेक्ट्रिकल विभागप्रमुख डॉ. आर. एन. पाटील आदींचा मोलाचा वाटा आहे.
-----
‘डीकेटीई’ला विविध मान-सन्मान
डीकेटीई संस्थेला एआयसीटीई (दिल्ली) यांनी तीनदा ‘बेस्ट इंडस्ट्री- लिंकड् टेक्निकल इन्स्टिट्यूट’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. इतर विविध बेस्ट इंजिनिअरिंग महाविद्यालयासाठीचेही पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘नॅक’मार्फत सलग दोन वेळेसच ‘ए प्लस’चा सन्मान प्राप्त झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com