थेट पाईप

थेट पाईप

07699

जॅकवेलमध्ये आठवड्यात येणार पाणी
थेट पाईपलाईन योजना; कॉपर डॅम काढण्याचे काम चार दिवसात संपण्याची शक्यता

कोल्हापूर, ता. ६ ः थेट पाईपलाईन योजनेच्या काळम्मावाडी धरणस्थळावरील कॉपर डॅम काढण्याचे काम चार दिवसात संपण्याची शक्यता आहे. त्यानंतर जॅकवेलमध्ये पाणी येणार असून, पाणी योजनेतील हे महत्वाचे काम या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. तसेच पंप बसवण्याच्या कामालाही सुरूवात झाली आहे.
शहरासाठी महत्वाच्या असलेल्या थेट पाईपलाईन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. धरणातून जॅकवेलसाठी पाणी आणणाऱ्या पाईपलाईनचे काम गेल्याच महिन्यात झाले आहे. त्याचवेळी जॅकवेलच्या कामासाठी पाणी अडवण्यासाठी बांधलेला कॉपर डॅम काढण्याचेही काम सुरू केले होते. दहा जूनपर्यंत डॅम काढला जाईल असे ठेकेदाराच्यावतीने सांगण्यात आले होते. त्यानुसार आता तीन मीटर उंचीचा बांध काढण्याचे शिल्लक आहे. हा बांध काढताच जॅकवेलमध्ये पाणी जाणार आहे. योजनेतील हे महत्वाचे काम पूर्ण होणार आहे. जॅकवेलवर बांधल्या जात असलेल्या एका पंप हाऊसमध्ये पंप बसवण्याचे काम सुरू आहे. तसेच दुसऱ्या जॅकवेलवरील पंप हाऊसचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर त्यातही पंप बसवले जातील.
आता पंप बसवण्याबरोबरच वीज वाहिनी टाकण्याचे तसेच काही ठिकाणचे जोड पूर्ण करण्याचे काम आहे. वीज वाहिनीचे काम जूनमध्ये पूर्ण केले जाईल असे सांगण्यात येत आहे. पाईपलाईन टाकण्यात आली असूनस त्यावरील एअर व्हॉल्व बसवले आहेत. पुईखडी येथील तसेच धरणस्थळावरील पाण्याच्या टाकीचे काम झाले आहे. त्यामुळे वीजजोडणी झाल्यानंतर चाचणी घेण्यास वेळ लागणार नाही. दीड महिन्यात ती केली जाण्याचा अंदाज आहे.

कोट
कॉपर डॅमची तीन मीटरची राहिलेली भिंत काढण्याचे काम सुरू आहे. चार दिवसात ते पूर्ण झाल्यानंतर जॅकवेलमध्ये पाणी येणार आहे. त्यानंतर इतर कामे शिल्लक राहणार आहेत.
-नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com