पंडीत धनंजय जोशी यांची रंगतदार मैफल

पंडीत धनंजय जोशी यांची रंगतदार मैफल

पंडित धनंजय जोशी यांची रंगतदार मैफल
कोल्हापूर, ता. ६ ः सुमधुर आवाज, रागाचा शिस्तबद्ध विस्तार, आस मिंड यांचा विपुल प्रमाणात वापर, अलंकारिक सरगम, चपळ तानक्रिया, रचनात्मक आकृतिबंध यांचा अपूर्व मिलाफ घडवत सूरमणी पंडित धनंजय जोशी यांनी किराणा पतियाला घराण्याच्या गानवैशिष्ट्यांचे मनोहारी दर्शन घडवत मैफल रंगतदार केली. गायन समाज देवल क्लबतर्फे या स्वरमैफलीचे आयोजन करण्यात आले.
पंडित जोशी यांनी विलंबित एक तालातील सायंगेय मधुवंती रागातील ‘आये मोरे शाम’ या बंदिशीने मैफलीची सुरुवात केली. त्याच रागात ‘जावो जावो श्याम कन्हैया’ ही द्रूत त्रितालातील रचना पेश केल्यावर कर्नाटक संगीतातून हिंदुस्थानी संगीतात आलेल्या सरस्वती रागातील ‘संदेसवा मोरे पियासो’ ही रचना सादर केली. त्यानंतर ‘रतिहून सुंदर मदन मंजिरी’ हे सुवर्णतुला नाटकातील पद, बा. भ. बोरकरांचे ‘नाही पुण्याची मोजणी’ हे भक्तीगीत सादर करून, ‘तम निशेचा सरला’ या भैरवीने मैफिलीची सांगता झाली. महेश देसाई व स्वरूप दिवाण यांनी तबला व संवादिनीची साथ केली. पंडित विनोद डिग्रजकर, डॉ. भाग्यश्री मुळे, डॉ. विनोद ठाकूर-देसाई, अजित कुलकर्णी, डॉ. भरत ठकार, प्रदीप कुलकर्णी उपस्थित होते. श्रीकांत डिग्रजकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी कलाकारांचे स्वागत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com