देशभरात ऑक्टोबरपासून ‘ज्वेलरी शॉपिंग फेस्टिव्हल’

देशभरात ऑक्टोबरपासून ‘ज्वेलरी शॉपिंग फेस्टिव्हल’

देशभरात ऑक्टोबरपासून
‘ज्वेलरी शॉपिंग फेस्टिव्हल’
पारंपारिक दागिन्यांचे प्रदर्शन भरणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी) तर्फे देशभरात १२ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान भारत ज्वेलरी शॉपिंग फेस्टिव्हल होणार आहे. देशातील ज्वेलरी पर्यटन विकसित करणे. देशाला ज्वेलरी हब बनविण्याचे उद्दिष्टे ठेवून या फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. भारतीय कला, संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी पारंपारिक दागिन्यांचे देशातील विविध आठ शहरांमध्ये प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याची माहिती ‘जीजेसी’चे संचालक दिनेश जैन यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
देशातील ज्वेलर्ससाठी विश्‍वासार्हता निर्माण करणे, ग्राहकांना ज्वेलरीमधील नवकल्पनांची माहिती देण्याच्या उद्देशाने आयोजित या फेस्टिव्हलमध्ये सुमारे पाच हजार ज्वेलर्स सहभागी होतील. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून या फेस्टिव्हलची सुरूवात होईल. दिवाळीपर्यंत त्याचा कालावधी राहणार आहे. पारंपारिक दागिन्यांच्या प्रदर्शन, लिलावातून जमा होणारी रक्कम ‘जीजेसी’तर्फे सीएसआर फंडात दिली जाणार असल्याचे जैन यांनी सांगितले.
या फेस्टिव्हलच्या कालावधीत दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांना संबंधित ज्वेलर्सकडून एक कूपन दिले जाईल. त्यातून विजेत्यांची निवड केली जाणार आहे. एकूण ३८ कोटींची बक्षीसे दिली जातील. त्यात ग्राहक, विक्रेते, आदींचा समावेश असणार आहे, असे फेस्टिव्हलचे सहसंयोजक वसंत बिरावत यांनी सांगितले. यावेळी कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, सचिव माणिक जैन, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष विजय हावळ, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com