राज्यातील विमानतळप्रश्नी ‘महाराष्ट्र चेंबर’सोबत लवकरच बैठक

राज्यातील विमानतळप्रश्नी ‘महाराष्ट्र चेंबर’सोबत लवकरच बैठक

07712

‘महाराष्ट्र चेंबर’समवेत लवकरच
राज्यातील विमानतळप्रश्नी बैठक

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे; विविध मागण्यांचे निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः राज्यातील विविध विमानतळप्रश्नी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲग्रीकल्चरसमवेत लवकरच बैठक घेतली जाईल, असे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी कोल्हापुरात दिले. ‘महाराष्ट्र चेंबर’चे अध्यक्ष ललित गांधी यांनी त्यांची विमानतळावर भेट घेतली. चेंबरच्या शिष्टमंडळाने हॉटेल सयाजी येथे त्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. चेंबरचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य नितीन धूत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.
राज्यातील विविध विमानतळांचा विकास, विविध मार्गांवरील विमानसेवा, प्रलंबित प्रश्न, बंद असलेले विमानतळांची वस्तुस्थिती धूत यांनी मांडली. त्यावर विविध विमानतळप्रश्नी ‘महाराष्ट्र चेंबर’समवेत लवकरच बैठक घेतली जाईल. व्यापार-उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक विमानतळांवरील विमानसेवा लवकरच सुरू केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री शिंदे यांनी दिले. शिष्टमंडळात ‘महाराष्ट्र चेंबर’चे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य रमाकांत मालू, प्रकाश शहा, राम मुंदडा, मुकेश खाबनी, मयूर शहा आदींचा समावेश होता.

चौकट
शिष्टमंडळाच्या मागण्या
-विमानतळांचे प्रश्न, सुविधांसंदर्भात ‘महाराष्ट्र चेंबर’च्या शिष्टमंडळाला बैठकीला निमंत्रित करावे
-कोल्हापूरच्या विमानतळाचे संस्थापक छत्रपती राजाराम महाराजांचे नाव कोल्हापूर विमानतळाला द्यावे
-जळगाव येथील विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू करावी
-सोलापूर (होटगी रोड) येथील विमानतळ तांत्रिक कारणांमुळे बंद असून सुरू करावे
-कोस्ट गार्डच्या रत्नागिरी विमानतळावरून विमानसेवा सुरू करावी
-अमरावती, अकोला विमानतळांचा विकास करावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com