जयप्रभा

जयप्रभा

‘जयप्रभा’ जागा गैरव्यवहार प्रकरणी
तक्रारीकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष
कोल्हापूर, ता. ६ ः जयप्रभा स्टुडिओच्या जागेबाबत झालेल्या गैरव्यवहाराबाबत दिलेल्या तक्रार अर्जाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. तसेच, कोणतीही चौकशी वा सुनावणीही होत नसल्याचा आरोप प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकाद्वारे केला.
या प्रकरणी आता सांस्कृतिक विभागाने महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती व अहवाल मागितला आहे. या पार्श्‍वभूमीवर देसाई यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे, की जयप्रभा स्टुडिओ व त्याच्या शेजारी असणारी सरकारी जागेतील गैरव्यवहाराबाबत मार्च २०२२ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दिला होता. पण, त्याची आजअखेर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतलेली नाही. या प्रलंबित तक्रार अर्जाबाबत मार्चमध्ये तक्रार अर्ज दिला होता. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकार व पदाचा गैरवापर करून बेकायदेशीररीत्या तो निकाली काढला आहे. राजकीय दबावामुळे या प्रकरणात चौकशी व सुनावणी होत नाही. जयप्रभा स्टुडिओची जागा महापालिका हद्दीतील आहे. कायद्यातील तरतुदीनुसार या तक्रार अर्जाची चौकशी करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाच आहे. तसेच, यातील गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, प्रधान सचिव, अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुनावणीबाबत तक्रार अर्ज प्रलंबित आहे. याबाबत कोणताही निर्णय अथवा आदेश शासनाकडून दिलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com