समस्त मुस्लीम समाज

समस्त मुस्लीम समाज

ओळ
कोल्हापूर ः शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त न्यू पॅलेस येथे मंगळवारी सोन्याच्या शिवमूर्तीला अभिषेक करून पूजन करण्यात आले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, युवराज मालोजीराजे, यौवराज यशराजे यांच्या हस्ते हा सोहळा झाला.
०००००००००००
जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांबरोबर ठाण मांडून होते.
००००००००००००००००००

अपप्रवृत्तींना पोलिसांनी वेळीच रोखावे
---
मुस्लिम समाज संघटनेचे पत्रक, एकोप्याचे आवाहन
कोल्हापूर, ता. ६ ः काही तरुणांनी लावलेल्या आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूरच्या एकतेला तडा गेल्यासारखे वातावरण तयार झाले. त्यामुळे पोलिसांनी अशा समाजकंटकांना वेळीच ठेचावे, त्यांना कडक शासन करावे, अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करीत आहोत. तरच अशा प्रवृत्ती पुन्हा निर्माण होणार नाहीत, असे पत्रक कोल्हापुरातील समस्त मुस्लिम समाजाने आज रात्री प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात म्हटले आहे, की कोल्हापुरातील मुस्लिम समाज छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांना आदर्श मानून त्यांच्या विचारांनुसार जगत आहे. राजर्षी शाहूंची ही नगरी जातीय सलोख्याची नगरी म्हणून प्रसिद्ध असताना काही समाजकंटकांनी आक्षेपार्ह स्टेटस लावले, त्या समाजकंटकांना कुणीही पाठीशी घालणार नाही. अन्यायी व जुलमी राजवटीविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. बारा बलुतेदार व अठरापगड जातींना न्याय देणारे हे स्वराज्य होते. अशा छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक दिनी ही घटना घडणे दुर्दैवी आहे. अशा समाजकंटकांमुळे कोल्हापूरची शांतता, एकोपा, बंधुभाव बिघडू देऊ नये, याची आपण सर्वांनी दक्षता घेऊन शांतता प्रस्थापित करूया, असे आवाहन समस्त कोल्हापूरवासीयांना करीत आहोत. संबंधित तरुणाने केलेल्या कृत्याचाही जाहीर निषेध करीत असून, पोलिसांनी त्याच्यावरही कडक कारवाई करावी. या पत्रकावर कादर मलबारी, आदिल फरास, रियाज सुभेदार, अफजल पिरजादे, जाफरबाबा सय्यद, झाकीर कुरणे, तौफीक मुल्लाणी, अब्दुल हमीद मिरशिकारी, मुश्‍ताक मलबारी, वासीम चाबुकस्वार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com