आजरा ः गिरणीकामगार निवेदन बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः गिरणीकामगार निवेदन बातमी
आजरा ः गिरणीकामगार निवेदन बातमी

आजरा ः गिरणीकामगार निवेदन बातमी

sakal_logo
By

ajr71.txt

ajr73.jpg....

08008
गारगोटी ः येथे आमदार प्रकाश आबिटकर यांना निवेदन देताना काॅ. शांताराम पाटील व संघटनेचे पदाधिकारी.

आमदार आबिटकरांना सर्व श्रमिक संघटनेचे निवेदन
आजरा, ता. ७ ः गिरणी कामगारांचे प्रश्नासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा करावा, अशी मागणी सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन सर्व श्रमिकचे तालुकाध्यक्ष काॅ. शांताराम पाटील यांनी आमदार आबिटकर दिले. यावेळी काॅ.अतूल दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत गिरणीकामगारांना घरे मिळावी यासाठी लोकशाही मार्गाने केलेली आंदोलने व प्रयत्न याबाबत चर्चा झाली. मुंबईत गिरणी कामगारांना हक्कचे घर मिळाले पाहिजे. एनटीसीच्या जागेत घरांची उपलब्धता करावी. १८०० एकर जमिनीवर गिरणी कामराचा हक्क असून, ही जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी द्यावी. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ७५ हजार घरे दाखवतो म्हणाले होते, ती घरे अधिकाकाऱ्यांना माहीत आहेत. ती ताबडतोब दाखवावी व गिरणी कामगारांना उपलब्ध करून द्यावी, या मागणीचे निवेदन व संघटनेने प्रसिद्ध  केलेले पुस्तिका आमदार आबिटकरांना देण्यात आली. यावेळी गोपाळ गावडे, कृष्णा चौगले, शिवाजी सावंत, मानाप्पा बोलकेंसह चंदगड, आजरा , भुदरगडचे गिरणी कामगार उपस्थित होते.