आक्षेपार्ह स्टेटस् लावणाऱ्यांवर कारवाई करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आक्षेपार्ह स्टेटस् लावणाऱ्यांवर कारवाई करा
आक्षेपार्ह स्टेटस् लावणाऱ्यांवर कारवाई करा

आक्षेपार्ह स्टेटस् लावणाऱ्यांवर कारवाई करा

sakal_logo
By

ich85.jpg
08185
इचलकरंजी : आक्षेपार्ह स्टेटस्‌ लावणाऱ्या युवकांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन समस्त मुस्लिम समाजातर्फे प्रातांधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांना दिले.
----------------
आक्षेपार्ह स्टेटस् लावणाऱ्यांवर कारवाई करा
समस्त मुस्लिम समाजातर्फे मागणी; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
इचलकरंजी, ता. ८ : येथील समस्त मुस्लिम समाजातर्फे जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह स्टेटस्‌ लावणाऱ्यांचा निषेध केला. आक्षेपार्ह स्टेटस्‌ लावून समाजात तेढ व अशांतता निर्माण करणाऱ्या युवकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशा समाजकंटकांची प्रवृत्ती ठेचून काढावी, अशी मागणी समस्त मुस्लिम समाजाने केली. मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांना दिले. इचलकरंजी गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील उपस्थित होते.
शहर व परिसरातील समस्त मुस्लिम समाज हा छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांना आदर्श मानणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचे काम केले. मात्र याच राजाच्या शिवराज्याभिषेक दिनादिवशी तरूणांनी मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस लावून जातीय तेढ निर्माण करत तणाव निर्माण केला. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. अशा समाज कंटकांचे समर्थन केले जाणार नसून पाठीशीही घातले जाणार नाही. हे कृत्य करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. कैश बागवान, अहमद मुजावर, उमर मुल्ला, जावेद मोमीन, इमरान मकानदार, मोहसीन पटेल, नदीम शेख, रियाज जमादार आदी उपस्थित होते.