३ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

३ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

किलबिलाटाने गजबजणार आज शाळा...
एक लाख १५ हजार जणांना गणवेश; तीन लाख ३३ हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : सव्वा महिन्यांची उन्हाळी सुटी संपवून उद्या (ता. १५) पासून जिल्ह्यातील विविध इयत्तांमधील विद्यार्थी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये येणार आहेत. त्यांच्या किलबिलाटाने शाळा परिसर गजबजून जाणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण तीन लाख ३३ हजार २१६ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी एकत्रितपणे १३ लाख २६ हजार ७६२ पाठ्यपुस्तके मोफत दिली जाणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळांमधील सर्व मुली, अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले अशा एकूण एक लाख १५ हजार ७४८ विद्यार्थ्यांना एक गणवेश मोफत मिळणार आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, शासकीय शाळा, खासगी अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली जाणार आहेत. नवोदित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शाळांमध्ये उद्या (ता. १५) प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यात पाठ्यपुस्तके, गणवेश वितरण, गुलाबपुष्प, गोड खाऊ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. त्याची शाळा पातळीवरील तयारी पूर्ण झाली आहे.
-----------------
कोट
समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्व शाळांमध्ये मोफत वितरण करावयाची पाठ्यपुस्तके पोहोचली आहेत. गणवेश वाटपाचे एकूण तीन कोटी ४७ लाख २४ हजार ४०० रुपयांचे अनुदान तालुका पंचायत समितींकडे वर्ग केले आहे.
- शशिकांत कदम, सहायक कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा अभियान
--------------
तालुकानिहाय आकडेवारी
तालुका*गणवेश दिले जाणारे विद्यार्थी*पाठ्यपुस्तके मिळणारे विद्यार्थी
आजरा*३८८७*९९३०
भुदरगड*५७६९*१४६४४
चंदगड*७९२८*१८२०२
गडहिंग्लज*६९६१*२०४५२
गगनबावडा*२०१०*४४६३
हातकणंगले*१९६०७*७९७३०
कागल*१०३३९*२९११८
करवीर*१७८७१*४३९६४
पन्हाळा*१०२९८*४६५८३
राधानगरी*९००८*२७०१३
शाहूवाडी*८८०६*२०४५२
शिरोळ*१३२६४*१८६६५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com