फुटबॉल सरावाला बंदी

फुटबॉल सरावाला बंदी

फुटबॉलचे संग्रहित छायाचित्र वापरावे.
....

शुल्क भरा अन् मैदानावर सरावाला या!

प्रशासनाचे फुटबॉलपटूला पत्र; तीस वर्षांच्या सरावात व्यत्यय, फुटबॉलपटूंत संताप

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १८ : शुल्क भरा आणि मैदानावर सरावाला या, असे पत्रक काढल्याने शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सराव करणाऱ्या फुटबॉलपटूंची पंचाईत झाली आहे. क्रीडा अधिविभागाच्या परिसरातील मैदानावरील पोल हटवले असून, तेथे क्रिकेटचे मैदान तयार केले आहे. त्यामुळे सरावासाठी जायचे कोठे, असा प्रश्‍न फुटबॉलपटूंना पडला आहे.
मंगळवार पेठेतील प्रॅक्टिस फुटबॉल क्लबसह अन्य फुटबॉलपटू विद्यापीठाच्या मैदानावर १९९३ पासून सरावासाठी सकाळी हजेरी लावतात. सकाळी सहा ते नऊ ही त्यांची सरावाची वेळ असते. यापैकी काही खेळाडू विद्यापीठाच्या संघातून खेळले आहेत. त्यांनी चमकदार कामगिरी करून विद्यापीठाच्या लौकिकात भर घातली आहे. काही जण प्रशिक्षकाच्या भूमिकेत असून, सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूंना तंत्रशुद्ध फुटबॉलचे ते धडे देत आहेत. त्याच्या जोरावर स्थानिक फुटबॉल स्पर्धांत ते वैयक्तिक बक्षीसांचे मानकरी ठरत आहेत.
शहरातील मैदानांची स्थिती लक्षात घेता, छत्रपती शिवाजी स्टेडियम निव्वळ क्रिकेटचे मैदान म्हणून ओळखले जात असले तरी तेथेही काही संघ फुटबॉलचा सराव करतात. छत्रपती शाहू स्टेडियमवर फुटबॉल स्पर्धा होत असल्याने, तेथे संघांना सराव करता येत नाही. गांधी मैदान असो की, शेंडा पार्कातील मैदान तेथेही काही संघांचा सराव सुरू असल्याने, उर्वरित फुटबॉलपटूंसाठी विद्यापीठाचे मैदान आधार आहे. शेकडो फुटबॉलपटू तेथे अनेक वर्षे सराव करत आहेत.
विद्यापीठ प्रशासनाने त्याकरिता शुल्क आकारणीचा विषय कधी उपस्थित केला नाही. अथवा खेळाडूंना विद्यापीठ मैदानावर सरावासाठी कधीच प्रतिबंध केला नाही. गेल्या काही महिन्यांपासून मात्र फुटबॉलपटूंच्या सरावात व्यत्यय आणला जात आहे. सुरक्षा रक्षकांकडून त्यांना सरावासाठी मज्जाव केला जात आहे. विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे शुल्क भरा आणि सरावाला या, या आशयाचे पत्र शहरातील एका फुटबॉलपटूला पाठविण्यात आले आहे.
-----------------
कोट
‘कोल्हापूरची फुटबॉल पंढरी अशी ओळख असल्याने, घराघरांत फुटबॉलचे वेड आहे. सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूंना हा खेळ आकर्षित करणारा आहे. मात्र, त्यांना शुल्क भरून खेळाचे प्रशिक्षण घेणे जमत नाही. त्यांच्या सरावासाठी विद्यापीठाने मैदान खुले करावे. आजपर्यंत शिस्तीने खेळाडू सराव करत आहेत. त्यांच्याकडून काही गैरवर्तणूक झाली तर संघाचे व्यवस्थापन त्यांच्यावर कारवाई करेल.
- विश्‍वास कांबळे, ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक
------------------
कोट -

‘क्रिकेटची स्पर्धा असल्याने मैदानावरील पोल हटवले आहेत. ते नंतर बसवण्यात येतील. काही फुटबॉलपटूंकडून सुरक्षारक्षकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार शुल्क आकारून सरावाला परवानगी दिली जात आहे.
- डॉ. शरद बनसोडे, क्रीडा अधिविभाग प्रमुख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com