आठवडा बाजार

आठवडा बाजार

Published on

10058
गडहिंग्लज : फळबाजारात कर्नाटकातील तोतापुरीची आवक वाढली असून खरेदी करताना ग्राहक. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)

पाऊस लांबला, दर वाढले
कोथिबिंर ५०, मेथी ३० रुपये पेंडी, तोतापुरीची आवक वाढली
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : पाऊस लांबल्याने येथील भाजीमंडईत पालेभाज्यासह फळभाज्यांचे दर वाढले आहेत. मुळातच खरिपासाठी रान मोकळे केल्याने आवक कमी आहे. कोंथिबिर ५० रुपये तर मेथीची भाजी ३० रुपये पेंडी असा दर वधारल्याने ग्राहकाचे बजेट कोलमडले आहे. टोमॅटो, वांगी, हिरवी मिरची, प्लॉवर यांचे दरही वधारले आहेत. फळबाजारात हापूस आंब्याची आवक कमी असून कर्नाटकातील तोतापुरीची आवक भरपूर आहे.
दिवसेंदिवस पाऊस लांबेल तशी भाजीमंडईत आवक कमी होत चालली आहे. पंरतु मागणी कायम असल्याने दराचा आलेख चढता आहे. मुख्यतः पालेभाज्या तर दुर्मिळ झाल्या आहेत. स्थानिक पालेभाज्यांची आवक बंद होऊन दोन महिने झाले. लगतच्या कर्नाटकातील पालेभाज्यांच्या आवकेवर सध्या भाजीमंडई तग धरून आहे. कोंथबिर ५०, तर मेथीचा दर ३० रूपयावर पोहोचला आहे. फळभाज्याही सरासरी ८० रुपये किलो आहेत. यामुळे ग्राहकांचे बाजाराचे बजेट दुपटीने वाढले आहे. बिन्सचा किलोचा दर १५० रुपये झाला आहे. वांगी, टोमॅटो, वांगी, हिरवी मिरची यांचे दर २० ते ३० टक्‍क्यांनी वाढल्याचे विक्रेता स्वप्नील डोमणे यांनी सांगितले. दहा किलोचे दर असे टोमॅटो, वांगी, दोडका ३००, हिरवी मिरची ६५०, गवार, ढब्बू ६००, कारली ४००, बिन्स १२०० रुपये.
फळबाजारात फळांचा राजा आंब्याचा हंगाम अंतिम ठप्प्यात पोहोचला आहे. कोकणातून हापूस आंब्याची आवक मंदावली आहे. मुख्यतः लागट आंब्याचे प्रमाण अधिक आहे. हापूस ३०० ते ४०० तर पायरी २०० ते ३०० रुपये असा डझनाचा दर आहे. तुलनेत तोतापुरीची आवक भरपूर आहे. नगाला आकारानुसार १० ते २० रुपयांपर्यंत दर होते. सफरचंद १५० ते २००, पेरू, डाळिंब, माल्टा १२० किलो आहेत. जनावरांच्या बाजारात पाऊस लांबल्याने हिरवा चारा उपलब्ध होण्याचे दुरावत चालले आहे. साहजिकच नवी जनावरे घेण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याने व्यवहार कमी झाले आहेत. म्हशींची ५५ तर शेळ्या मेंढ्याची ७० हून अधिक आवक नोंदल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. म्हशी २५ ते ७५ हजार, शेळ्यामेंढ्या ५ ते १५ हजार रुपये असे दर होते.
------------------
चौकट
करंजीचा हंगाम संपला
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असणारा करंजीचा हंगाम सरला आहे. त्यामुळे आठवडा बाजारातील आवक रोडावली आहे. यंदा मार्च महिन्यापासून आवक सुरू झाली होती. एप्रिलमध्यानंतर ती वाढली. किलोचा २५ ते ३५ असा प्रतवारीनुसार दर राहिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.