शालेय क्रीडा स्पर्धांचा बिगुल वाजणार

शालेय क्रीडा स्पर्धांचा बिगुल वाजणार

Published on

शालेय क्रीडा
स्पर्धा होणार
राष्ट्रीय स्तरापर्यंत

कोल्हापूर, ता. १८ : गतवर्षी केवळ राज्यस्तरापर्यंत शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या. यंदा मात्र राष्ट्रीय स्तरापर्यंत स्पर्धा होणार आहेत. जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे स्पर्धांच्या नियोजनासाठी हालचाली सुरू झाल्या असून, जुलैमध्ये तालुकास्तरावर स्पर्धेबाबत बैठका होणार आहेत. ऑगस्टमध्ये स्पर्धा सुरू होतील, असे क्रीडाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील शाळांतील मुले-मुली शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आतुर आहेत. जिल्हा, विभागीय, राज्य, राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांचे आयोजन केले जात असले तरी गतवर्षी केवळ राज्यस्तरापर्यंत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचा नारळ उशीरा फुटल्याने राष्ट्रीय स्पर्धांचे वेळापत्रक कोलमडले. त्या पाश्‍र्वभूमीवर शासनाने निवडक खेळांच्या राज्यस्तरीय शिबिरांचे आयोजन केले. यंदा मात्र शालेय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी केली जाणार आहे. त्याकरिता शाळांत विविध क्रीडा प्रकारांचा सराव सुरू झाला आहे. तालुकास्तरावरच्या बैठका जुलैमध्ये होऊन, त्यात वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.