‘अकरावी’ ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

‘अकरावी’ ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

Published on

‘अकरावी’ ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

आज सायंकाळी पाचपर्यंत वेळ; विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे प्रवेश प्रक्रिया समितीचा निर्णय

कोल्हापूर, ता. १८ ः शहरस्तरीय अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यास समितीने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उद्या, सोमवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांची मागणी आणि सीबीएसई बोर्डाच्या काही विद्यार्थ्यांना अद्याप शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नसल्याने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाणिज्य इंग्रजी माध्यम आणि विज्ञान विद्याशाखेच्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाईन अर्जातील दुसरा भाग भरण्यास १४ जूनपासून सुरूवात झाली. त्यात दिवसागणिक अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. या प्रक्रियेत अर्ज करण्याचा आज सायंकाळ पाच वाजेपर्यंत मुदत होती. या मुदतीत एकूण ६३८४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले. त्यात विज्ञान विद्याशाखेचे ५२५६, तर वाणिज्य इंग्रजी माध्यमाच्या ११२८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत सोमवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला नाही. त्यांनी या मुदतीत अर्ज करावा, असे आवाहन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीतर्फे करण्यात आले आहे.
....

दहावी पुरवणी परीक्षेसाठी करा अर्ज

दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे वाढविण्यात आली आहे. त्यात विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २१ जून, तर विलंब शुल्कासह २२ ते २५ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.